Ticker

6/recent/ticker-posts

सोळशी केदारेश्वर रोडवरील जबरी चोरी करनाऱ्या आरोपींच्या वाठार पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे व वाठार पोलिसांची मोठी कारवाई.
वाठार स्टेशन ,दि ९ :- ( प्रतिनिधी) दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी सोळशी केदारेश्वर मंदिर रस्त्यावर चवणेश्वर गावच्या हद्दीत असणार्‍या रोडवर दाखल असलेल्या पुणे धनकवडी येथील पती- पत्नीस तीन अनोळखी इसमांनी दगडाचा धाक दाखवून हाताने मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम मोबाईल असा 2 लाख 51 हजार रुपये किमतीचे माल जबरदस्तीने चोरून नेले बाबत वाठार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख अजय बंसल अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार कोरेगाव तालुक्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे पथक करून वेगळ्या पद्धतीने तपास सुरू केला. नेमण्यात आलेल्या पथकाने सदरच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती घेतली असता सदरचा घडलेला गुन्हा सातारा जिल्ह्याच्या पोलीस अभिलेखा वरील सराईत गुन्हेगार यांनी केला असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली परंतु नमूद आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्यामुळे पोलिसांना चकवा देत होते अटक होऊ नये यासाठी पोलिसांची दिशाभूल करीत होते त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा माहिती मिळणे साठी तसेच त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांना मोठे आव्हान होते. दरम्यानच्या काळात दिनांक 9 मार्च रोजी वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांना वरील नमूद आरोपींपैकी दोन आरोपी वाई परिसरात असल्याबाबत व एक आरोपी लोणंद परिसरात असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने वेगवेगळ्या पथकाला सदरच्या नमूद आरोपींना ताब्यात घेण्यासाठी आदेश देण्यात आले. आदेशानुसार तपास पथकाने वाई लोणंद येथे जाऊन सापळा लावून प्राप्त बातमीची शहानिशा केली व १)महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे रा. मोती चौक फलटण २)विकास उर्फ लाल्या अनिल जाधव रा. बावधन तालुका वाई ३) हिमालय सतीश धायगुडे रा. खेड बुद्रुक तालुका खंडाळा या तिन्ही संशयित आरोपींना आज दिनांक 9 मार्च रोजी लोणंद व वाई परिसरातून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सोळशी केदारेश्वर येथील गुन्हा व फलटण शहर, फलटण ग्रामीण येथे आणखी गुन्हे केल्याचे सांगितले आहे.
अजय कुमार बंसल पोलिस अधीक्षक सातारा व धीरज पाटील अपर पोलिस अधीक्षक सातारा यांच्या सूचनेप्रमाणे माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी कोरेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके नेमून त्यांच्या सूचनेप्रमाणे स्वप्निल घोंगडे सपोनि वाठार पोलीस स्टेशन व पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील सहायक फौजदार धुमाळ, गुजर,भोसले, पो. ना.तानाजी चव्हाण, सचिन जगताप, दत्तात्रय पवार, अतुल कुंभार, राहुल मोरे, नितीन पवार, इम्रान मुलाणी पोलीस कॉ. तुषार आडके, संदीप देखणे, श्रिकांत खरात, तुषार ढोकरे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याची कारवाई केली असून कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले.

फोटो खालील ओळ :- वाठार स्टेशन - सदरच्या कारवाईत उपस्थित असणारे कोरेगाव पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे तसेच वाठार पोलिस स्टेशनचे सपोनि स्वप्नील घोंगडे व त्यांचे सर्व सहकारी.

Post a Comment

0 Comments