सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मायणी येथील चांदणी चौक परिसरातील तीन पान शॉप व एक हॉटेल चालकांवर काल सोमवार दि १२ एप्रिल 2021 रोजी मायणी पोलिसांनी निर्बंध असताना दुकाने सुरू ठेवल्याचे कारणाने कलम 188 प्रमाणे कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मायणी पोलीस दुरक्षेत्र येथून मिळालेली माहिती अशी, शासनाने पारित केलेल्या नियमाप्रमाणे मायणी चांदणी चौक परिसरात सध्या मिनी लॉकडाऊन ची अंमलबजावणी चालू असून फक्त अत्यावश्यक सुविधा देणारे आस्थापना उघडी ठेवण्यास परवानगी आहे.परंतु बंद अस्थापनात समावेश असताना या परिसरातील चार पान शॉप अँड जनरल स्टोअर्स व हॉटेल चालू असलेली आढळल्याने मायणी दुरक्षेत्राचे पीएसआय शहाजी गोसावी यांनी या गाडेवाल्यांवर कारवाई करत शंकर काबुगडे,निवृत्ती कोळी,तुषार तारळेकर आणि नवनाथ गाढवे यांचेवर भादविसकलम 188,269 , सह आपत्ती व्यवस्थापन अधि . 2005 ये कलम 51 ( 5 ) महाकोविड -19 उपाययोजना 2020 चे कलम -11 प्रमाणे वडूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिक तपास पीएसआय शहाजी गोसावी करीत आहेत.
कारवाई व्हावी परंतु ती निपक्ष
सध्या लॉकडाऊन परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव टाळण्याकामी सर्वत्र बंद चे वातावरण असताना बंद आदेश असणाऱ्या अजून काही दुकानांची उघडझाप चालू असलेली आढळते आहे . परंतु पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईत “तोंड बघून होणारी कारवाई” ही सर्वसामान्य जनतेच्या चर्चेचा विषय बनली असून शासनाचे कडक नियम राबवताना सरसकट व निष्पक्ष कारवाईची अपेक्षा पोलीस प्रशासनाकडून होत आहे.

0 Comments