Ticker

6/recent/ticker-posts

म्हसवड पालिकेचे तिसरे उपनगराध्यक्ष म्हणून दिपक बनगर यांची निवड



म्हसवड  प्रतिनीधी 

म्हसवड पालिकेच्या उपनगराध्यक्ष या पदाचा राजीनामा धनाजी माने यांनी दिल्यानंतर रिक्त असलेल्या या पदासाठी दिपक बनगर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांचेकडे आल्याने या पंचवार्षीक मधील  तिसरे उपनगराध्याक्ष व पालिकेच्या इतिहासात व  विरकरवाडीच्या इतिहासात विरकरवाडीचे पहिले उपनगराध्याक्ष होण्याचा मान पालिकेचे नगरसेवक दिपक बनगर यांनी उपाध्यक्ष पद मिळवून केला  आज नगराध्यक्ष भगतसिंग विरकर यांच्या व मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांच्या उपस्थित म्हसवड पालिकेच्या बैठकीत  दुपारी दिड वाजता मुख्याधिकारी डॉ सचिन माने यानी दिपक बनगर यांचा उपाध्यक्ष पदासाठी एक मेल अर्ज दाखल झाल्याने दिपक बनगर हे  उपनगराध्यक्ष जाहिर करताच पालिके बाहेर बनगर समर्थकांनी फटाक्याची व गुलालाची उधळन करुन आनंद व्यक्त केला  

पालिकेचे उपनगराध्यक्ष धनाजी माने यांनी तिनं महिने पालीकेचे उपनगराध्यक्ष पद घेतले त्यानंतर पदाधिकारी यांचे बैठकीत ठरल्या प्रमाणे  दिनांक ६/४/२०२१ रोजी माने यांनी  राजीनामा दिल्याने  गेले सात दिवस रिकामे असलेले उपाध्यक्ष या पदासाठी काल सोमवारी दुपारी १ वाजता दिपक मंगल यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने रूपाली दिड वाजता मुख्याधिकारी माने यांनी दिपक बनगर हे उपाध्यक्ष असल्याचे जाहिर करताच पालिके बाहेर फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण पालिके बाहेर एक तास सुरु होती दुपारी चार वाजता नुतन उपनगराध्यक्ष बनगर यांनी विरकरवाडी येथे मिरवणुक काढून फटाक्यांच्या अतिषबाजी हालगीचा कडकडाटात गुलालाची उधळण केल्याने विरकरवाडीच्या रस्त्यांनी गुलाबी चादर ओढल्याचे चित्र दिसत होते

 म्हसवड पालिकेचे या पंचवार्षिक मधील तिसरे उपनगराध्यक्ष म्हणून दिपक बनगर यांची निवड बिनविरोध करण्यात आली आज प्रलयात विरकरवाडीने स्व शिवाजीराव विरकर, सुर्वाबाई बनगर ,रविंद्र विरकर व विद्यामान नगराध्यक्ष भगतसिंह विरकर हे चौथे नगराध्यक्ष असले तरी उपनगराध्यक्ष हे पद पहिल्यांदाच दिपक बनगर यांनी मिळवले यावेळी पदाधिकारी म्हणून नगराध्यक्ष भगतसिंह विरकर हे एकमेव पदाधिकारी उपस्थित होते त्याचे अभिनंदन करण्यासाठी श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने,राहुल म्हेत्रे, सुरेश पुकळे विजय गुरव आदी उपस्थित होते
            

Post a Comment

0 Comments