शंकर इंदलकर
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
साताराः सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण भागातील जनता या कोरोना काळात मेटाकुटीला आली असून सद्यस्थितीत निवडून दिलेल्या अनेक लोकप्रतिनिधींनीही जनतेकडे पाठ फिरवल्याने आपले गार्हाने मांडायचे तरी कुणाकडे असा प्रश्न नागरिकांन पडला आहे.
गेल्या वर्षापासून कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार गेल्या कडक लॉकडाऊनमध्ये असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली बांधिलकी जपली. सर्वसामान्य जनतेने आदेशाचे पालन काटेकोरपणे केले. ग्रामीण भागातील काही लोकांना ‘लॉकडाऊन’ म्हणजे काय? याचा अर्थही माहित नव्हता. हळूहळू तो समजला व तो पाळला. परंतु, यात लोकप्रतिनिधी कोठेही सामान्य जनतेच्या बरोबर दिसले नाहीत फक्त प्रशासकीय अधिकारी आपले कर्तव्य बजावताना दिसत होते.
जनता कोणत्या परिस्थितीमध्ये आहे? त्यांच्यापर्यंत आरोग्य सुविधा वेळेवळ पोच होत आहेत का? त्यांना काही समस्या तर नाही ना? अशा अनेक समस्यांची साधी विचारपूस सुद्ध काही लोकप्रतिनिधींकडून झाली नाही.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडण्ाुकीत हे राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी जागे झाले. प्रत्येक गावागावातील प्रत्येक घराघरात जावून मास्क, सॅनिटायझर वाटप करुन आम्हाला जनतेची किती काळजी आहे, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून होत होता. ते दिलेले मास्कही हलक्या दर्जाचे होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा या मास्कचा वापर केला नाही. लोकप्रतिनिधी दिवस रात्र न बघता गावच्या प्रचारात व्यस्त होते. प्रशासनाचे कोणतेही नियम या प्रचारावेळी पाळण्यात आले नव्हते. खोटी आश्वासने देवून गावातील युवकांचा या निवडण्ाुकीत वापर करण्यात आला. या युवकांसाठी कधीही या नेत्यांनी रोजगार मेळावे किंवा स्पर्धा परीक्षांची अभ्यासिका तसेच कोणा एका युवकाचीही नोकरीसाठी शिफारस केली नाही. फक्त आपला स्वार्थ तेवढा साध्ाून घेतला. निवडण्ाूक झाली गावागावात यांचेच बिनकामाचे बगलबच्चेही निवडून आले. त्यानंतर हे सारे पुढारी पुन्हा गायब झाले.
आता राज्यासह जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे. कोरोनाची दुसरी लाट तेजीत असताना हे लोकप्रतिनिधी परत आपल्या घरात लपून बसले आहेत. कोरोनाच्या लाटेमध्ये सर्व सामान्य जनता पुन्हा भरडली जात आहे. लसीकरणासाठी आरोग्य केंद्रावर रांगाच्या रांगा लागल्या आहेत. तरी लस मिळत नाही उद्या या, पर्वा या अशी उत्तरे त्यांना मिळत आहेत. अनेक गावे कन्टेनमेंट झोनमध्ये आली शिवाय राज्यात ‘निर्बंधां’च्या नावाखाली पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाला.
आज जिल्ह्यात दहा हजारांच्या घरात सक्रीय रुग्ण आहेत. आणि बेडची संख्या ओ केवळ साडेतीन हजार. वर्षभरात कोणीही बेडची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. आता अनेकांना बेड उपलब्ध होत नाही. विशेष म्हणजे इथल्या कोणत्याही राजकीय नेत्याला कोरोना झाला की तो थेट मुंबई गाठतो. सामान्य जनता मात्र इथेच खितपत पडते. ही परिस्थिती एकीकडे असताना दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेकांना आता आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह कसा करायचा याचाच प्रश्न पडला आहे. तर लोकप्रतिनिधी आपल्या बगलबच्च्यांना घेवून आगामी येणार्या निवडणुकीची रणनिती रचत आखत आहेत हे या जनतेचे दुर्दैव. निवडण्ाुकीच्या वेळी प्रत्येक गावागावात जावून लोकांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाण्ाून घेत होता तशाच प्रकारे मतदार संघातील आरोग्य केंद्रावर, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जावून गावातील लोकांच्या आरोग्याविषयी काय उपाययोजना राबविल्या?, कशा प्रकारे गावात कोरोनाविषयी जनजागृती होतेय? याची माहिती घेवून गावकर्यांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी लोकप्रतिनिधींनी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामान्य जनता करीत आहे.
ग्रामदक्षता समिती अॅक्टिव्ह होण्याची गरज
गेल्या लॉकडाऊनमध्ये गावातील ग्रामदक्षता समितीने गावामध्ये चांगल्या प्रकारे काम केले. गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी प्रयत्न केले. परंतु, आता अनेक ग्रामपंचायतीमध्ये नवनिर्वाचीत सरपंच तसेच सर्व सदस्य आहेत. त्यांना गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी गावात कोणकोणत्या उपाययोजना राबवाव्यात याची कल्पना नाही. त्यामुळे ग्रामदक्षता समिती पुन्हा अॅक्टीव करण्याची गरज असून त्यांना तातडीने प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
नुसती ताडपत्री, खोरी, कोळपे देवून विकास होतो का?
राज्य सरकारकडून सांगण्यात येते की, कोरोना काळात विकासकामे थांबली नाहीत. परंतु, स्थानिक लोकप्रतिनिधींकडून ग्रामीण भागात कोणत्याही प्रकारची विकासकामे होताना दिसत नाहीत. उलटे हेच लोकप्रतिनिधी सांगातात की, लॉकडाऊनमुळे सर्वप्रकरची टेंडर प्रक्रिया रखडली आहे.
महेश शिंदे ठरलेत दमदार आमदार
सध्या जिल्ह्यातले आमदार आपापल्या मतदारसंघात जरी कार्यरत असले तरी सर्वात वरचा नंबर आहे तो आमदार महेेश शिंदे यांचा कोविडच्या काळात स्वखर्चाने आजही ते सामान्य जनतेच्या घराघरात पोचले आहेत. त्यामुळे कोरेगाव मतदारसंघात ते सध्या दमदार आमदार ठरले असून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचीही भिरकीट सुरु आहे. तर पालकमंत्र्यांसह इतर आमदार मात्र इलेक्शन, पत्रकबाजी आणि मतदारसंघातील नको त्या भानगडी यातच अडकल्याचा आरोप त्यांच्या मतदारांतून होत आहे.

0 Comments