सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मायणी:
येथील चावडी चौक,बस स्टँड व मराठी शाळा परिसरातील तीन दुकांदारांवर काल बुधवारी दि 14 एप्रिल 2021 रोजी मायणी पोलिसांनी निर्बंध असताना दुकाने सुरू ठेवल्याचे कारणाने कलम 188 प्रमाणे कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मायणी पोलीस दुरक्षेत्र येथून मिळालेली माहिती अशी, वडूज पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत कैलास माळी,प्रविणकुमार खाडे,मधुकर घाडगे यांचेवर भादविसकलम 188,269 , सह आपत्ती व्यवस्थापन अधि . 2005 ये कलम 51 ( 5 ) महाकोविड -19 उपाययोजना 2020 चे कलम -11 प्रमाणे वडूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिक तपास सहा.फौजदार गुलाब दोलताडे करीत आहेत.

0 Comments