सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जाहीर केलेले कडक निर्बंध अजुनही अनेकांच्या पचनी पडलेले नाहीत. ‘बंदी’च्या पहिल्या दिवशीही अनेकांना ‘मुक्तसंचार’ सुरु होता. एकीकडे जनतेला अजुनही कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट दिसत होते तर प्रशासन चारदोन कारवाया करून कागदोपत्री दिवस भरताना दिसत होते. जनतेत उद्रेक असल्यामुळे फिरणार्यांना कोणत्या भाषेत समजावयचे हा प्रशासनासमोरचा प्रश्न असला तरी निर्बंधांच्या आदेशाबद्दल अद्यापही संदिग्धताच असल्याने सातार्यासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात ही टाळेबंदी जाणवतच नव्हती. केवळ दुकाने बंद असून लोकांचे हुंदडणे सुरुच होते.
कोणाचा भाजीपाला . कोणाचा किराणा .. कोण अर्जेंट दवाखान्यात निघालेय, कोणाला एटीएम मधून पैसे काढायचेत ही अनेक कारणे देऊन ऐन संचारबंदीतही सातारकरांनी घराबाहेर पडणे सुरूच ठेवल्याने ब्रेक द चेनचा उद्देश सफल होणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी शहरात वाहतूकीची वर्दळ कमी जाणवली तरी नागरिकांची गर्दी मात्र कायम जाणवत होती.
पहिल्या दिवशी संचारबंदीच्या आदेशाचे सुस्पष्ट ज्ञान असतानाही घरात थांबण्याची सवय नसलेल्या सातारकरांनी मंडई, औषधे, दवाखाना, बँक अशी विविध कारणे पोलीसांना देत चकविण्याचा प्रयत्न केलाच. बंद दुकानांच्या पुढे चकाट्या पिटणार्यांची संख्या कमी नव्हती.
पाचशेएक पाटी व तांदूळ आळी येथे किराणा मालांच्या दुकानांपुढे गर्दी जाणवतच होती . सातार्यात हापूस आंब्याची आवक वाढू लागल्याने फळ मार्केटला सुद्धा गर्दी दिसून आल्याने ब्रेक द चेन करण्यासाठी लागू झालेल्या संचारबंदीच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गतवर्षी सरसकट सेवा कडकडीत लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात येऊन घरपोच सेवेची व्यवस्था करण्यात आल्याने करोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र आवश्यक सेवांमध्ये किराणा माल, मेडिकल दुकाने दूध डेअरी, स्वीट मार्ट, खाद्यविक्रेते व फळविक्रेते यांचा समावेश आहे. या विविध कारणांची सरबत्ती पहिल्याच दिवशी ऐकून पोलीस यंत्रणाच हैराण झाली आहे.
वाहतूक सर्रास सुरु
शहराच्या रिक्षा व इतर वाहतूक व्यवस्था ना पन्नास ट्क्के क्षमतेचे बंधन असताना चारचाकी वाहने सुध्दा सर्रास रस्त्यावर दिसत होती. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या पथकाने पोवई नाका तसेच इं ठिकाणी वाहन चालकांना मनाई केली. मात्र वाहनचालकांनी मात्र त्यांना सफाईदार चकवा देत नियमांची पळवाट दाखविली. विनाकारण रस्त्यावर फिरणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मांजरे यांनी दिला आहे.
वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी ही शहरात दिवसभर पेट्रोलिंग सुरू ठेवले होते. पहिल्या दिवशी पोलिसांनी सौजन्य दाखवत विनाकारण बाहेर फिरणार्यांची समजूत घातली.
आंतर जिल्हा प्रवासाचे काय?
संपूर्ण देशात करोना संक्रमणाचा हॉट स्पॉट ठरलेल्या पुणे शहरातील सातार्यांकडे वाढलेल्या लोंढयामुळे महामारीचा फैलाव झाला होता. त्यामुळे गतवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी झाली होती. मात्र यंदा ही बंदी यंदाच्या लॉक डाऊनमध्ये नसल्याने सातार्यात पुणे वरून येणार्या सातारकरांचे लोंढे वाटू लागले आहेत. त्यामुळे करोना संक्रमणाचा वेग वाटण्याची भीती पुन्हा निर्माण झाली आहे. या संक्रमणाला रोखण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे.
प्रशासनाने आरटीपीसी आर चाचणीचा अहवाल स्वतः जवळ बाळगणे बाहेर फिरणार्यांना बाळगावयाचे आहेत संचारबंदीच्या पहिल्या दिवशी करोना चाचणीचे अहवाल पत्र फार कमी जणांकडे आढळून आले. सातारकरांना स्वयंशिस्तीचे भानं देण्यासाठी कठोर नियमांची छडी जिल्हाधिकार्यांना उगारावी लागणार आहे.

0 Comments