सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वरकुटे मलवडी/ दहिवडी
गोंदवलेकर संस्थानच्या वतीने कोरोनाच्या आपत्ती निवारणासाठी मदतीचा ओघ सुरू असून संस्थानचा दवाखाना कोविड सेंटरसाठी प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला आहे.तसेच दोनशे बेड आणि आवश्यकतेनुसार कोरडा शिधा प्रशासनाला पुरवणार असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली आहे.
कोविडच्या भीषण परिस्थितीत संस्थानने सुरुवातीच्या काळातच पंतप्रधान निधीसाठी 50 लाख,मुख्यमंत्री निधीसाठी 25 लाख व ससून रुग्णालयात कोविड सेंटरसाठी 25 लाख अशी एक कोटी रुपयांची मदत देऊ केली होती.याशिवाय जिल्ह्यातील विविध ठिकाणी गरजू 9000 हुन अधिक लोकांना सुमारे 50 लाखाहून अधिक रकमेच्या शिधा वाटप केले आहे.याशिवाय प्रशासनाच्या मागणीनुसार म्हसवड येथील कोविड सेंटर साठी गेल्या वर्षीच रुग्णवाहिका देण्यात आली आहे.दहिवडीत सुरू होत असलेल्या कोविड सेंटरसाठी सुद्धा गेल्या दोन दिवसांपूर्वी साथ बेड देण्यात आले आहेत.याशिवाय म्हसवड येथील कोरोना केअर सेंटरसाठीही बेड व गाद्या देण्यात आल्या आहेत.तसेच आणखी 140 बेड प्रशासनाकडे देण्यात येतील.कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी कोरडा शिधा देखील प्रशासनाकडे देण्यात येणार आहे.
गोंदवल्यात मठाच्या वतीने रुग्णसेवेसाठी अनेक वर्षांपासून रुग्णालय सुरू असून येथे नामांकित डॉक्टर येऊन रुग्णसेवा करतात.केवळ औषधोपचारच नव्हे तर शस्त्रक्रिया सुद्धा मोफत केल्या जातात. गेल्या वर्षांपासून कोविडमुळे हा दवाखाना बंद आहे.परंतु प्रशासनाच्या मागणीनुसार हा दवाखाना कोविड सेंटर साठी प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला असून कोरोनाबधित रुग्णांची चांगली सोय होणार आहे.
समाधी मंदिर हे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कायम खुले आहे.महाराजांच्या शिकवणीचे अनुकरण करून येथील परंपरा कायम राखली जाते.विविध जातीधर्माचे कर्मचारी महाराजांच्या समाधी मंदिरात सेवा करतात असेही विश्वस्तांनी स्पष्ट केले.
रुग्णसेवेसाठी सर्व सेवासुविधा असणारा दवाखाना येथे उभारण्यात येत आहे.हे प्रगतीपथावर असलेले काम पूर्ण होताच सुसज्ज दवाखाना सुरू करण्यात येईल अशी माहितीही विश्वस्तांनी दिली.

2 Comments
श्री महाराज सर्वांतर्यामी राम पहात तसेच सर्व विश्वस्त सेवेकरी आणी कर्मचारी भक्तांची सेवा करतात ह्यात कौटुंबिक प्रेमाचा अनुभव येतो महामारीचे काळात महाराजांना अभिप्रेत कार्य संस्थान करीत आहे
ReplyDeleteश्रीराम जय राम जय जय राम !!
ReplyDeleteश्रीराम जय राम जय जय राम !!
श्रीराम जय राम जय जय राम !!
श्रीराम जय राम जय जय राम !!
श्रीराम जय राम जय जय राम !!