विक्रांत भोसले
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
बिजवडी:
बिजवडी पंचक्रोशीत वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बिजवडी आपत्ती व्यवस्थापन समिती मार्फत बिजवडी बाजारपेठ १ मे ते ५ मे सलग पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बिजवडी व बिजवडी पंचक्रोशीत कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. बिजवडी पंचक्रोशीमध्ये कोरोना रुग्णसंख्या अंदाजे पन्नासच्या जवळ पास असेल. ही रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि आरोग्ययंत्रणेवरील ताण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तरी या कालावधीत मेडिकल आणि दवाखाने या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यांनी स्वतः जाऊन प्रत्येक दुकानदाराला या निर्णयाची माहिती दिली.तरी दुकानदारांनी व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन या तिघांनी केले.
साखळी तोडण्यासाठी बंद
बिजवडी ही मध्यवर्ती बाजारपेठ असल्याने पंचक्रोशीमधील नागरिकांची वर्दळ इथे दिसून येते. कोरोनाची वाढती लोकसंख्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे ही साखळी तुटण्यासाठी बिजवडी सलग पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
- युवराज बोराटे, तलाठी बिजवडी

0 Comments