Ticker

6/recent/ticker-posts

वाळू तस्काराविरुद्ध मायणी पोलिसांची कारवाई



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

मायणी:  पाचवड, ता. खटाव येथील विखळे गावाकडून येणार्‍या अवैध वाळू वाहतूक करणार्‍यावर मायणी पोलिसांनी छापा टाकून एक पिकअप वाहनासह 2 लाख 3 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणार्‍या माफियांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत मायणी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांना गुरुवाी पहाटे 3.15 वाजता मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दूरध्वनीवरून कॉन्स्टेबल योगेश सूर्यवंशी होमगार्ड रोहित घाडगे, विश्‍वास बागल यांना दिलेल्या माहितीनुसार पाचवड येथील मराठी शाळेजवळ पाळत ठेवली असता विखळे गावाकडून कडून आलेल्या  पिकअप क्रमांक एमएच 11 बीएल4166 याची पाहणी केली असता अर्धा ब्रास वाळू आढळून आल्याने या वाहनावर कारवाई करण्यात आली. यावेळी पिकअप ड्राईव्हर विशाल बाळासाहेब साळुंखे अंधाराचा फायदा घेऊन मराठी शाळेच्या संरक्षण भिंतीवरून उडी टाकून पसार झाला. 

सदर कारवाईत पिकअप किंमत अंदाजे दोन लाख व अर्धा ब्रास वाळू रुपये साडेतीन हजार असा एकूण दोन लाख तीन हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती मायणी पोलीस दुरक्षेत्र येथून मिळाली.अधिक तपास पीएसआय शहाजी गोसावी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments