Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हावासियांना जिल्हाधिकारी यांनी अश्वस्थ करावे: सुरेंद्र गुदगे



मायणी 

 कोरोना च्या पहिल्या लाटेत कोरोना रुग्णाचा प्रतिदिन हजाराचा आकडा दुसऱ्या लाटेत अडीच हजाराच्या वर पोहोचला. रुग्णांना बेड मिळवताना प्रचंड धावपळ करावी लागत आहे. लवकरच ऑगस्टमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही लाट किती मोठी असेल ? त्यासाठी जिल्हा प्रशासनाने काय तयारी केली आहे ?याबाबत जनतेला जिल्हाधिकाऱ्यांनी अश्वस्थ  करावे असे  विनम्र आवाहन जि.प. सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केले आहे.
       याबाबत बोलताना सुरेंद्र गुदगे म्हणाले कोरोनाच्या पहिल्या लाटे विरुद्ध लढताना कोणतीही सिस्टीम तयार नव्हती त्यामुळे सिस्टीम तयार होईपर्यंत लाॉकडाऊन पाळण्यात आले.त्यानंतर सिस्टीम तयार झाली परंतु दोन लाटे मधील वेळ प्रशासनाने वाया घालवला आणि दुसऱ्या  लाटेशी लढताना लागणारी यंत्रणा वाढविण्यात प्रशासन कमी पडले. त्यामुळे रुग्णांना बेड मिळेनात अशा गंभीर अवस्थेला सामोरे जावे लागले. कोरोना रुग्णांपैकी जवळपास 70 टक्के रुग्ण घरीच आयसोलेशन मध्ये बरे होतायत.
 30 टक्के रुग्णांना सेवा देताना प्रशासनाची दमछाक झालीय. आता यातून धडा घेऊन तिस-या लाटेशी सामना करण्यासाठी प्रशासन काय तयारी करीत आहे? हे जाणून घेण्याचा जनतेचा अधिकार आहे. त्या बाबत जिल्हाधिकारी यांनी जनतेशी संवाद साधावा.
     पहिल्या लाटेत साधे, ऑक्सिजनयुक्त व व्हेंटिलेटर युक्त किती बेड उपलब्ध होते?.आत्ता किती आहेत?तिसऱ्या लाटे पर्यंत आपण किती उपलब्ध करणार आहोत?याचे नियोजन जनतेला माहीत करून द्यावे. औषधे व ऑक्सिजन यांची कमतरता दुसऱ्या लाटेत आहे. त्याबाबत तिसर्‍या लाटेत ही अवस्था नसेल याबाबत नियोजनाची खात्री जनतेला द्यावी.
पहिल्या लाटेत कोरोनाने वयोवृद्धांना टार्गेट केले होते. दुसऱ्या लाटेत वयोवृद्धा बरोबर चाळीशीतील लोकांना कोरोनाने टार्गेट केले आहे. तिसर्‍या लाटेत तरुणाई म्हणजे 25 ते 40 वयोगटातील तरुणाई टार्गेट झाली तर ही फार मोठी समाजाची हानी होईल. त्यासाठी काय तयारी आपण करत आहोत? तिसर्‍या लाटेत तरुणाई टार्गेट झाल्यास जनतेच्या संतापाला हॉस्पिटल व प्रशासन दोघांनाही सामोरे जावे लागेल. लहान मुलांना किंवा बालकांना टार्गेट केले गेले तर पुण्याच्या धर्तीवर चिल्ड्रेन मदर कोरोना सेंटर चे नियोजन केले आहे का? तिसरी लाट थोपवण्यासाठी किंवा तिची तीव्रता कमी करण्यासाठी  लसीकरणाच्या नियोजनाची माहिती द्यावी.शासनाचे निर्देश राबवण्यापुरते मर्यादित न राहता स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची आवश्यकता आहे .शासनाने जिल्हा नियोजन मधून मोठी रक्कम 122 कोटी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे निधीची कमतरता नाही मात्र इन्फ्रास्ट्रक्चर उभे करताना मोठी  दिरंगाई होत आहे. साधे ऑक्सिजन पाईपलाईनसह पंचवीस-तीस बेड वाढवण्यासाठी महिन्याचा वेळ जात आहे.नवीन कोरोना सेंटर सुरू करताना दोन-तीन आठवडे जाताहेत. प्रशासन आपत्कालीन परिस्थितीत एवढे संथ कसे काम करीत आहे? याला गती मिळणार का नाही ?असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत. त्यामुळे भितीदायक वातावरण तयार झाले आहे.
   तरी जनतेचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रशासनाच्या तयारी बाबतची माहिती मीडियाच्या माध्यमातून जनतेला देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा वासियांची संवाद साधावा असे आवाहन गुदगे यांनी शेवटी केले आहे

Post a Comment

0 Comments