Ticker

6/recent/ticker-posts

सभापती शिवरुपराजे खर्डेकरांच्या घरी चोरट्यांचा डल्ला



सात लाखांच्या रोकडीसह 15 लाखांचा ऐवज लंपास

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

फलटण:  फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे यशवंतराव निंबाळकर (खर्डेकर) यांच्या आसू येथील निवासस्थानी अज्ञाताने तब्बल 15 लाख20 हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना घडली असून याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवरुपराजे यशंवराव निंबाऴकर (खर्डेकर) (रा. आसू ता. फलटण जि. सातारा) यांना शेतीसाठी तसेच घरगुती वापरासाठी जास्त पैशाची गरज असल्याने दि 06/07/2021 रोजी 7 लाख रुपये आसू, ता. फलटण येथील राहते घरातील बेडरुमचे आतील बाजूस असणारे खोलीतील लोखंडी कपाटात रक्कम ठेवले होते. त्यानंतर दि 12/07/2021 रोजी वरील कपाट उघडून पाहिले असता सदरची 7 लाख रुपये रोख  रक्कम फिर्यादी यांना दिसली नाही तसेच कपाटातील असणारे इतर वस्तू कोणत्याही गेल्या नव्हत्या म्हणुन सदर रकमेबाबत घरातील लोकांना तसेच कामाला असणार्‍या लोकांचेकडे चौकशी केली परंतु सदर रकमेबाबत कोणीही माहिती दिली नाही.

 सदरची रोख रक्कम कोणी नेहली असावी याबाबत फिर्यादी विचार विनिमय करीत होते त्याबाबत त्यांनी घरातील लोकांचे व्यतिरिक्त इतर कोणासही सांगितले नाही. 

त्यानंतर दि 29/07/2021 रोजी फिर्यादी यांच्या सुनबाई संयुक्ता यांनी फिर्यादी यांना सांगितले की, त्यांचे बेडरुमच्या आतील बाजुस असणारे लोखंडी कपाटात त्यांनी त्यांचे ठेवलेलेल सोन्याचे मनी मंगऴसुत्र ,डायमंडचा नेकलेस , सोन्याची चैन व रोख रक्कम 50 हजार रुपये आढळून येत नसल्याचे सांगितले.

यावर फिर्यादी व  इतर घरातील लोंकांनी त्यांचे कपाटाची पाहणी केली त्यावेळी त्यांचे कपाट  अज्ञात इसमाने चावीने उघडून आतील वस्तु चोरुन नेऊन पुन्हा कपाट बंद करुन ठेवल्याचे दिसले. त्यावेळी फिर्यादी यांची खात्री झाली की त्यांच्या घरातील कोणीतरी अज्ञात इसमाने 7 लाखांची रोख रक्कम, सोन्याचे व डायमंड असणारा नेकलेस, पाच तोळा वजनाचे मंणी मंगळसूत्र, चार तोळे वजनाची लेडीज चेन व रोख रक्कम 50 हजार रुपये असे ऐकूण 8 लाख 20 हजार रुपये असे दोन्ही ठिकाणचे एकुण 15 लाख 20 हजार रुपये किंमतीचे रोख रक्कम व सोन्याचे वस्तु व डायमंडचे वस्तु कोणीतरी अज्ञात चोरटयांने त्यांचे कपाट चावीने उघडुन आतील वरील वस्तु व रोख रक्कम चोरुन ते पुन्हा बंद केले.

याप्रकरणी फिर्यादी श्रीमंत शिवरूपराजे यशवंतराव निंबाळकर (खर्डेकर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments