नगराध्यक्षा डाॅ. प्रतिभा शिंदे यांनी भारतीय जनता पक्षातून थेट नगराध्यक्षपदासाठीची निवडणुक लढविली हाेती. त्या निवडून आल्यानंतर वाईतील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या गटास धक्का बसला हाेता. त्यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईनंतर आता राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात आनंदाचे वातारवण पसरले आहे.
डाॅ. प्रतिभा शिंदे यांनी एका कामाच्या मोबदल्यात ठेकेदारास 14 हजार रुपयांची लाच मगितल्याचा आरोप आहे. त्यांच्या अटकेनंतर त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन घेतला हाेता. दरम्यानच्या काळात पालिकेतील नगरसेवकांनी त्यांना पदावरुन बाजूला करा अशी मागणी राज्य शासनाकडे केली हाेती.
त्यानूसार दाेन वेळा सुनावणी झाली. शासनाने डाॅ. शिंदे यांना नगराध्यक्षपदावरुन हटविण्याचा निर्णय दिला. या निर्णयाने सातारा जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान या डॉ. प्रतिभा शिंदे यांना या पुढील सहा वर्षे कोणतीही निवडणुक लढवता येणार नाही असेही शासनाने दिलेल्या निर्णयात नमूद केले आहे.
0 Comments