Ticker

6/recent/ticker-posts

मायणी:- दत्ता कोळी

अनफळे येथील चव्हाण वस्ती वरील रात्रीच्या सुमारास अचानकपणे घरगुती गॅसचा स्फोट झाल्याने घर जळून खाक झाले
 घटनास्थळावरून व तलाठी पंचनामा वरून मिळालेली माहिती अशी अनफळे येथील चव्हाण वस्तीवर असणारे दादा रामू चव्हाण हे रात्रीच्या सुमारास जेवण करून गॅस सिलेंडर बंद करून घराच्या बाहेर बोलत बसले असताना अचानक पणे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला या स्पोटात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी जीवनावश्यक वस्तू व संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाले आहेत 
  यामध्ये प्रामुख्याने घरामध्ये असणारे रोख रक्कम ८० हजार रुपये तसेच सोन्याचे दागदागिने १ लाख ६८ हजार , कपाट ,फ्रिज ,टीव्ही,कुलर ,विवो मोबाईल संसार उपयोगी भांडी ,तसेच शासकीय सर्व कागदपत्रे दुचाकी व चार चाकी , इतर वस्तू या आगीमध्ये जळून भस्मसात झाले यावेळी सुमारे ६ लाख ३३ हजार ५०० रुपये आर्थिक नुकसान झाले  
तसेच दादासो चव्हाण यांच्या पत्नी या आशा स्वयंसेवीका असल्याने त्या संबंधित शासकीय कागदपत्रे व b l o च्या संबंधित कागदपत्रे ही यावेळी जाळून खाक झाली तरी शासनानकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी आशा पीडित कुटुंबाकडून व्यक्त होत आहे
  यावेळी गाव कामगार तलाठी उत्तम चव्हाण यांच्या कडून सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला.

नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

अनफळे येथील गॅस स्फोटाच्या घटनेतील चव्हाण कुटूंबीयाचे अतोनात नुकसान झाले असून या कुटुंबियांची राहण्याची व्यवस्था प्राथमिक शाळेत करण्यात आली असून त्यांना गॅसची व अन्नधान्याची व्यवस्था ताबडतोब करण्यात आली असून सदर घटनेसाठी तातडीने चव्हाण कुटूंबियांना शासकीय नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे 
- किरण जमदाडे, तहसीलदार , खटाव तालुका.

Post a Comment

0 Comments