Ticker

6/recent/ticker-posts

पाच वर्षापासून फरार आरोपी दहिवडी पोलिसांच्या जाळ्यात.

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
गोंदवले:   किरकसाल ता माण येथुन पाच वर्षा पूर्वी दुचाकी गाडीची चोरी करून फरार असलेल्या आरोपीला दहिवडी पोलिसांनी शिताफीने अटक केल्याची माहिती सहाय्य पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी किरकसाल ता माण येथील एकनाथ महादेव अवघडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून 14/5/2016 रोजी त्या घरात असलेली एम एच 11 ए एन 6977 ही दुचाकी चोरून नेहली या बाबत अज्ञात व्यक्ती विरोधात दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.सदर गुन्ह्यात चोरी झालेली दुचाकी आगाशिव नगर येतील नितीन प्रकाश तुपे यांच्या ताब्यात असल्याचे आढळून आली त्या तपासात त्याला अटक करण्यात करण्यात आली होती त्याच बरोबर त्या गुन्ह्यात मारुती शामराव तुपे हा पाच वर्षा पासून तो फरार होता 
सदर गुन्ह्यात फरार असलेला आरोपी किरकसाल येथे येणार असल्याची माहिती दहिवडी पोलिसांना गोपनीय पध्दतीने मिळाली होती त्यानुसार सापळा लावला होता त्यानुसार दहिवडी पोलिसांनी याला अटक केली व न्यायालयात दाखल केले आता त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी दिली याकामी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख सपोनि संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री पी जी हंगे, संजय केंगले,श्री रविंद बनसोडे,श्री प्रमोद कदम यांनी ही कारवाई केली.
दहिवडी पोलिसांनी पाच वर्षा पासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली यावेळी सपोनि संतोष तासगावकर आणि इतर कर्मचारी

Post a Comment

0 Comments