Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार नको, युवा नेता म्हणा....

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
येरळवाडी:
मला आता पत्रकार नको ‘युवा नेता’ म्हणा, असा शड्डू प्रशांत जाधवांनी नुकताच ठोकला. त्यामुळे त्यांच्या शड्डू मायणी गटात कोणाकोणाला घाम फोडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नुकताच येरळवाडी येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त युवा सरपंच योगेश जाधव यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास माणचे राष्ट्रवादीचे नेते व निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, वडूजचे ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे, माजी सभापती संदीप मांडवे  बाळासाहेब पोळ आदी मान्यवर उपस्थित होते. याच कार्यक्रमात प्रशांत जाधवांनी चौफेर टोलेबाजी केली.
ते म्हणाले, माझा निळू फुले करु नका. कारण निळू फुले हे चतुरस्त्र अभिनेते होते. मात्र, त्यांच्यावर जसा केवळ ‘खलनायका’ची भूमिका करण्याचा शिक्का पडला होता तसा माझ्यावर केवळ पत्रकाराचा शिक्का नको. आता इथून पुढे पत्रकार असा माझा उल्लेख न करता मायणी गटाचा युवा नेता म्हणा, असे आवाहन प्रशांत जाधव यांनी स्टेजवरील वक्त्यांना केले.  
याच कार्यक्रमात प्रभाकर देशमुख यांनी प्रशांत जाधव यांच्या राजकीय चातुर्याचे कौतुक केले. शिवाय सध्या प्रशांत हे कोणत्याही राजकीय पक्षात सक्रिय नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी राजकीय क्षेत्रात उडी घेतली. त्यात सुरुवातीलाच त्यांना चांगले यशही मिळाले. महाविकास आघाडीची त्यांची जवळीक असून आघाडीतील एका मोठ्या पक्षात ते लवकरच प्रवेश करणार आहेत. सातार्‍यापेक्षा वडूज, मायणी भागातले त्यांचे दौरेही वाढले असून प्रशांत जाधवांनी ठोकलेला शड्डू आता मायणी  गटात कोणाकोणाच्या जिव्हारी लागणार याकडे राजकीय निरिक्षकांचे लक्ष आहे.

Post a Comment

0 Comments