Ticker

6/recent/ticker-posts

मायणीत दरोड्याचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद तिघांना अटक

 


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मायणी/सातारा: 
चार दिवसांपूर्वी मायणी येथे सराफाच्या दुकानात घुसून पिस्टलचा धाक दाखवत सोने लुटण्याचा प्रयत्न करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने  गजाआड केली. संशयित आरोपी म्हसवड व सांगली येथील असून त्यातील एकजण सराफ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, एलसीबी पथकाने गुजरातमध्ये जाऊन ही कारवाई केली असल्याची मााजहती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत ाजदली.
आकाश सुखदेव जगताप (म्हसवड), अंकुश उर्फ दीपक संभाजी यादव (रा. बस्तवडे ता. तासगाव, जि. सांगली), मधुसूदन संदीपकुमार पारीक (रा. म्हसवड, जि. सातारा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, दि. 7 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता मायणी येथील बालाजी ज्वेलर्सच्या दुकानात घुसून दुकानदार अमित माने यांना पिस्टलचा धाक दाखवून ‘माल दे’, अशी दमदाटी करत सोन्याचे दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांच्या दुर्देवाने चोरीचा हा प्रयत्न फसला व तेथून ते पसार झाले. मात्र, या घटनेमुळे परिसर भीतीच्या छायेखाली गेला होता तर बाजारपेठेत खळबळ उडाली.
वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एलसीबीने तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज असल्याने त्यावरुन त्यातील एक संशयित हा आकाश जगताप असल्याचे समोर आले. एलसीबीने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर तो अहमदाबाद, गुजरात राज्यात असल्याचे समोर आले. त्यानुसार एलसीबीचे एक पथक गुजरातमध्ये गेले व त्याला तेथून ताब्यात घेतले.  अधिक चौकशी असता त्याने इतर साथीदारांची नावे सांगितली.  
एलसीबीने तपासाचा फास आवळत आणखी दोन संशयितांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, एक एअर पिस्टल व फटाके वाजवण्याचे खेळण्यातील पिस्टल असा 81 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जत केला.  या तीन संशयितांचा ताबा वडूज पोलिसांकडे देण्यात आला आहे.  
अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर अधीक्षक अजित बोर्‍हाडे,  निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश गर्जे,  आनंदसिंग साबळे, फौजदार गणेश वाघ यांच्यासह  उत्तम दबडे, सुधीर बनकर, संतोष पवार, अतिष घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, अनिल धुमाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, गणेश कापरे, अमित सपकाळ, अमोल माने, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, प्रवीण पवार, वैभव सावंत, केतन शिंदे, संकेत निकम, विक्रम पिसाळ, गणेश कचरे यांनी सहभाग घेतला. 

Post a Comment

0 Comments