सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मायणी: खटाव माण अँग्रो साखर कारखान्याचा सन २०२१-२२ या तृतीय गळीत
हंगामाचा शुभारंभ शुक्रवार दि. १५ ऑक्टोबर २०२१ रोजी विजयादशमीच्या शुभ
मुहूर्तावर दुपारी १२.३० वाजता सौ.इंदिरा प्रभाकर घार्गे यांच्या शुभहस्ते
तसेच कारखान्याचे संचालक मंडळ व मान्यवरांच्या उपस्थितीत कारखाना
कार्यस्थळावर संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याच्या संचालिका प्रीती
घार्गे यांनी दिली .
कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी उभारण्यात
आलेल्या कारखान्याच्या तृतीय हंगामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते ऊस मोळी
टाकून होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असणारा हा कारखान्याच्या
बॉयलर अग्नीप्रदीपन कार्यक्रम गत आठवड्यात संपन्न झाला असून सध्या
गळीतासाठी पूर्ण क्षमतेने सज्ज आहे.
कोविडच्या
पार्श्वभूमीवर कार्यक्रम खटाव माण साखर कारखान्याचे प्रमुख मान्यवर व
संचालक मंडळाच्या उपस्थित योग्य खबरदारी घेऊन पार पडणार आहे.या
कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व ऊस उत्पादक शेतकरी,ऊस तोडणी वाहतूक
कंत्राटदार,कर्मचारी याना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments