Ticker

6/recent/ticker-posts

मार्डी येथील भवानी मातेची यात्रा याही वर्षी रद्द



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
गोंदवले:
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अद्याप शासनाने घातलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच यात्रा टाळाव्यात असे आवाहन दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी केले आहे. मार्डी येथील भवानी  डोंगरावर कोजागिरी पौर्णिमेला दि 19 व 20 ऑक्टोबर रोजी  होणारी देवीची यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली.
          मार्डी गावाशेजारी असलेल्या डोंगरावर ग्रामदैवत भवानी  देवीचे मंदिर असून दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते.गेल्या दोन वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ही यात्रा झाली नव्हती.नुकतेच शासनाने भाविकांसाठी मंदिरे खुली केली असल्याने भवानी देवीची यात्रा होईल अशी चर्चा भविकांमधून व्यक्त होत आहे.परंतु अद्याप कोरोना पूर्णपणे संपलेला नसल्याने यात्रांना परवानगी नाही.याबाबत भवानी देवी यात्रा कमिटी , सरपंच , उपसरपंच , व ग्रामस्थ यांच्याशी दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी चर्चा केली.
       ग्रामस्थ व भाविकांनी गर्दी टाळण्याची अजूनही खूप आवश्यकता आहे असे सांगून श्री तासगावकर म्हणाले कोजागिरी पौर्णिमेस भवानी डोंगरावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येईल.परंतु  संबंधित ग्रामपंचायत, ग्रामस्थ व यात्रा कमिटीने अधिक खबरदारी घ्यावी.
         यावेळी मार्डी गावच्या सरपंच संगीता दोलताडे ,उपसरपंच संजीवनी पवार , डॉ उज्वलकुमार काळे, अशोक पवार, प्रभाकर पोळ, नंदकुमार पोळ,  पोलीस पाटील आप्पासो गायकवाड यांच्यासह यात्रा कमिटीचे व ग्रामपंचायत चे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
 

Post a Comment

0 Comments