पोलीसांनी कारवाई करण्याची मागणी
फलटण:
कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी शासन कठोर निर्णय घेत
आहे. मात्र फलटण पूर्व भागातील अवैध धंदे कोरोनाला निमंत्रण देत असल्याचे
चित्र दिसत आहे. या भागातील आसू, पवारवाडी, हणमंतवाडी, गुणवरे आदी
गावामध्ये मोठया प्रमाणावर खुलेआम अवैद्य धंदे सुरू आहेत. यावर पोलीसांनी
धाड टाकूनही दारू, मटका, हातभट्टी, गुटखा, अवैध गाईंची तस्करी असे अनेक
अवैध धंदे सुरु आहेत. त्यामुळे कामगार व तरुण युवकांना दारू, मटका, गुटखा
यांचे व्यसन जडले असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. यामुळे या
अवैध धंद्यावर करवाई करण्याची मागणी महिलांसह ग्रामस्थांमधून होत आहे.
फलटण
पूर्व भागातील आसू, पवारवाडी, हणमंतवाडी, गुणवरे आदी ठिकाणी सकाळपासून
रात्री उशिरापर्यंत खुलेआम अवैध देशी दारू, मटका व हातभट्टी दारूची विक्री
केली जाते. त्यामुळे गावातील तरुण युवकांना दारूसह मटक्याचे व्यसन जडले
आहे. अवैध धंद्याच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात चांगले आर्थिक उत्पन्न
मिळत असल्यामुळे अनेक व्यक्तींनी या व्यवसायात उडी घेतली आहे. मात्र या
अवैध धंद्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून महिला व युवतींमध्ये
असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. परंतु याकडे पोलीस प्रशासनाकडून
होणारे दुर्लक्ष हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान
मद्यपी मद्य प्राशन करून सार्वजिनक ठिकाणी गोंधळ घालत अर्वाच्च भाषेत
शिवीगाळ करत असल्यामुळे रस्त्याने ये-जा करणार्या महिला, कामगार,
विद्यार्थी व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. महिला व मुलींची छेड
काढण्याचा प्रयत्न दारुडे करत असून याची तक्रार देण्यास कुणी पुढे येत
नसल्यामुळे मद्यपींचा त्रास वाढला आहे. तसेच रोजंदारी करून आलेली मजुरी
कामगार दारूवर खर्च करीत असल्याने घरात भांडणाचे प्रकार वाढले आहेत. या
अवैध दारूची चोरटी विक्री थांबविण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्यामुळे
नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
आसू बनतेय दारू व मटक्याची राजधानी...!
फलटण
तालुक्याच्या पुर्वेकडे बारामती, माळशिरस, इंदापूर आणि फलटण या चार
तालुक्यांच्या सीमेलगत असलेले आसू हे सुमारे १० हजार लोकवस्तीचे गाव आहे.
पांडवकालीन मंदीरांमुळे या गावाला ऐतिहासिक वारसा ही लाभला आहे. काही
वर्षांपूर्वी कै.नारायणराव माने-पाटील यांच्या काळात गावाला आदर्श पोलीस
पाटील पुरस्कारही मिळाला होता, मात्र गेल्या काही वर्षांपासून या गावाला
अवैध धंद्याचा विळखा पडला आहे. या गावात देशी दारु, मटका व हातभट्टीच्या
दारूची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री जोमात सुरू असल्याने आसू दारू व
मटक्याची राजधानी बनत आहे.
गोडसेसाहेब तुमचा धाक दाखवा!
फलटण
ग्रामीण पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे धन्यकुमार गोडसे यांनी हाती
घेतल्यानंतर अनेक अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. मात्र, फलटण
पूर्व भागातील अनेक ठिकाणी अवैध धंदे जोमात सुरू असून याकडेही पोलीस
निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी लक्ष केंद्रित करून या धंद्याना आवर घालून
यांच्या कायमस्वरूपी मुसक्या आवळ्याची मागणी होत आहे. त्यामुळे गोडसेसाहेब
या अवैध धंदेवाल्यांना तुमचा धाक दाखवण्याची गरज आहे.
आसूतून मोठ्या प्रमाणात होतेय तस्करी!
काही
दिवसांपूर्वी आसू येथील बागडेवस्ती या ठिकाणी कत्तलखान्याकडे घेऊन
जाण्यासाठी बांधून ठेवलेल्या १ लाख ४० हजार किंमतीच्या एकूण सात जर्सी गाई
पोलीसांनी कारवाई करून पकडल्या होत्या. मात्र त्यानंतर आसू हे तीन
जिल्ह्यांच्या आणि चार तालुक्यांच्या सीमेवर वसलेले गाव असल्यामुळे पुन्हा
या गावातून तस्करी करण्यास सुरुवात झाली असल्याने आसू तस्करीचे केंद्र बनत
असून फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे हे केंद्र उध्वस्त करतील
का? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
0 Comments