Ticker

6/recent/ticker-posts

६ वर्षांपासून फरारी आरोपीस अटक

 

फलटण:-फलटण तालुक्यातील झिरपवाडी येथील 
जोतीराम चव्हाण खून प्रकरणातील मोक्क्याच्या गुन्हयात ६ वर्षांपासून फरारी असलेला आरोपी शरद अंकुश खवळे यास सातारा गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील झिरपवाडी येथे मंगळवार दिनांक १५ डिसेंबर २०१५ रोजी   मराठी शाळेजवळ मयत जोतिराम शंकर चव्हाण (वय ४२ वर्षे, रा.झिरपवाडी ता.फलटण) यांच्या साईराज हॉटेल या ठिकाणी आरोपी १) स्वप्नील मोहन काकडे, २) बंटी उर्फ प्रणील काकडे, ३) शरद अंकुश खवळे, ४) सागर धनाजी मोरे, ५) सुरज यशवंत अहिवळे, ६) मंगेश गौतम रणदिवे यांनी इर्टिगा कार क्रमांक एम.एच.१२-९५३५ मधून येवून जुन्या भांडणाच्या कारणावरुन व फिर्यादीने आरोपी विरुध्द दाखल केलेली गंभीर मारहाणीची केस सातारा कोर्टातून काढून न घेतल्याच्या कारणावरुन मयत जोतीराम चव्हाण खून केला, तसेच गुन्हयातील फिर्यादी विशाल रघुनाथ ढेंबरे (वय २५ वर्षे, रा. झिरपवाडी ता. फलटण) हा सोडविण्यासाठी गेला असता त्यास गंभीर जखमी केले होते, म्हणून त्यांच्या विरोधात फिर्यादी विशाल ढेंबरे यांनी फलटण शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्हयातील आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असल्याने तसेच सदरचा गुन्हा त्यांनी संघटितपणे केल्याच्या तपासामध्ये निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यातील आरोपी यांच्यावरती महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (एक) (दोन), ३ (२), ३(४) लावण्यात आले होते. नमुद गुन्हयात एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली होती, परंतू गुन्हयातील मुख्य आरोपी शरद अंकुश खवळे हा गुन्हा घडल्यापासून फरारी होता.

रविवार दिनांक.०३ ऑक्टोंबर २०२१ रोजी त्यांना शरद अंकुश खवळे हा सावळ ता. बारामती जि.पुणे येथे असल्याबाबत गोपनिय माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे त्यांनी पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना त्याबाबत माहिती देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली सावळ ता. बारामती येथे जावून आरोपी राहत असलेल्या ठिकाणी सापळा लावून मोक्क्याच्या गुन्हयात ६ वर्षांपासून फरारी असलेला आरोपी शरद अंकुश खवळे यास ताब्यात घेवून पुढील कार्यवाही साठी फलटण शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे , यांचे सुचनांप्रमाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखा सातारा पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश गर्जे सहायक पोलीस निरीक्षक , शरद बेबले पोलीस अंमलदार , प्रविण फडतरे, निलेश काटकर, गणेश कापरे, विशाल पवार, रोहित निकम यांनी सदरची कारवाई केली.

Post a Comment

0 Comments