विशेष प्रतिनिधी
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वडूज : गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यात इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास केली .जिल्ह्यात अन्य कुठे बँकेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही मात्र गेले तीन टर्म खटाव तालुक्यात सोसायटी मतदार संघात संचालक म्हणून काम करीत असलेले आणि अजातशत्रू म्हणून ओळख निर्माण करणारे प्रभाकर घार्गे यांना डावलून उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नकोसे झालेत, असा प्रश्न कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात असून समर्थकांनी घार्गेंसाठी दंड थोपडले आहेत.
माजी आमदार प्रभाकर घार्गे गेल्या काही महिन्यापासून अडचणीत आल्याने घार्गें तालुक्यात संपर्कात राहू शकले नाहीत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत असे असले तरी मात्र त्यांच्या पत्नी इंदिरा घार्गे पक्षाच्या कार्यक्रमास हजेरी लावत आल्या आहेत. त्यांच्या दोन्ही मुलीदेखील सामाजिक कार्यक्रमात पुढे येऊन काम करीत आहेत. खटाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचा कार्यक्रम,कोणाचा दौरा म्हटले की प्रभाकर घार्गे यांनीच पहावे इतरांनी फक्त हजेरी लावायची असा हा कार्यक्रम गेले तालुक्यातील जनतेने अनुभवलाय ते पक्षातील कार्यकर्ते नाकारू शकणार नाहीत. प्रभाकर घार्गे यांनी आमदार की असो की बँकेचे संचालक तालुक्याच्या हितासाठी त्यांनी जे जे करता येईल ते केले.पक्षात राहून पक्षाचे काम केले ,राष्ट्रवादी शिवाय इतर कोणत्याही पक्षातील लोकांशी सूडबुद्धीने वागले नाहीत.तालुक्यात अनेक सोसायट्यांना मोडकळीस आलेल्या त्यांना उर्जित अवस्थेत आणल्याचे एका सहकार खात्यातील अधिकाऱ्याने सांगितले. ज्यां घार्गेमुळे सोसायटी मतदारसंघ उर्जित आला त्यांनाच बाजूला ठेवून पक्षीय पातळीवर उमेदवारी रेमटायची ही पद्धत घार्गे समर्थक असलेल्यांना लसते आहे. घार्गे साहेबांवर संकट उभे राहिले म्हणून त्यांच्याशी आशा पद्धतीने आणि माघारी करणे योग्य नसल्याचेसमर्थकातचर्चाआहे.तालुक्यातदुष्काळ,कोरोना,पाणी टंचाई असो की कोरोना आशा विदारक स्थितीत त्यांनी पुढे येऊन हातभार लावला हे जनतेने पाहिले आहे. तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती ,बाजार समिती निवडणुकीत तालुक्याचे हित पाहून निर्णय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्तव्य पार पाडले . तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर पक्षाचे अनेक जण घार्गे जिल्हा बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत असताना आणि त्यांच्यावर बिकट प्रसंग आला असताना त्यांच्यावर कुरघोडी करणे बरं नव्हे.आज ते जात्यात आहेत उद्या कोण येईल ते सांगता येणार नाही त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी न्याय करावा असा काही कार्यकर्त्यांचा दबक्या आवाजात मतप्रवाह आहे.
प्रभाकर घार्गे यांची नेमकी भूमिका काय
निवडणूक कार्रक्रम नुकताच जाहीर करण्रात आला आहे. खटाव तालुका सोसायटी मतदारसंघातून नंदकुमार मोरे यांची अधिकृत उमेदवारीही पक्षाने जाहीर केली असून पक्षाने डावलल्यामुळे आता प्रभाकर घार्गे यांची नेमकी भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments