Ticker

6/recent/ticker-posts

कष्टकरी नवदुर्गांचा सन्मान हिच खरी दुर्गापुजा: मंगलताई देशमुख

व्यसनमुक्त महिला संघाचा उपक्रम
 नवरात्र उत्सव म्हणजे देवींचा उत्सव. देवींची उपासना स्रीवर्ग मोठ्या प्रमाणात करीत असतो.
दुर्गेची पुजा करीत असताना नऊ दिवस नऊरंगाच्या साड्या परीधान केल्या जातात पण अनेक गरीब व कष्टकरी कुटुंबातील महिला यापासून नेहमीच उपेक्षीत असतात. आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाहासाठी अत्यंत कष्ट  करणार्‍या नवदुर्गांचा सन्मान म्हणजेच खरी दुर्गा पुजा असल्याचे मत जवळवाडी येथे आयोजीत कार्यक्रमात बोलताना व्यसनमुक्त युवती-महिला संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ.मंगलताई देशमुख यांनी व्यक्त केले.व्यसनमुक्त महिला संघाचे वतीने आठ दिवसापूर्वी संघटनेच्या महिलांना साड्या जमा करण्याचे आवाहन केले होते.   यामधे ३०० हून अधिक साड्या जमा झाल्या असून अनेक तालुक्यातील गावात या उपक्रमाच्या माध्यमातून कष्टकरी नवदुर्गांचा सन्मान केला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आमच्या गावातील गोपाळवस्तीत रहाणार्‍या गरीब कष्टकरी नवदुर्गांचा सन्मान व्हावा अशी विनंती जवळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.वर्षाताई जवळ यांनी संघटनेकडे केली होती.
त्यांच्या मागणीनुसार जवळवाडी ता.जावली येथिल गोपाळवस्तीतील कष्टकरणार्‍या महिलांना साडी-चोळी भेट देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सौ.मंगलताई देशमुख म्हणाल्या नवरात्रौ उत्सवात देवीची उपासना करायलाच हवी ती आपली संस्कृती व परंपरा आहे.पण आज व्यसनाधिनतेमुळे  महिलांवरील अत्याचार वाढत असून त्यांचे शोषण होताना आपण पहात आहोत. प्रत्येक स्त्री चा सन्मान आई,बहीण, मुलगी म्हणून व्हायलाच हवा
तीच खरी देवी पुजा ठरेल. यावेळी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र पुरंदर तालुका यांचे वतीने श्री तुषार देशमुख यांनी जवळवाडी ग्रामपंचायतीला भाषण डायस भेट दिले.
व्यसनमुक्त महिला संघाच्या या अभिनव उपक्रमामुळे माझ्या गावातील महिलांना पुढच्या आयुष्यात लढण्यासाठी नक्कीच बळं मिळेल अशा भावना यावेळी  सरपंच सौ. वर्षाताई जवळ यांनी व्यक्त करून संघटनेचे आभार मानले.
या कार्यक्रमाला जवळवाडी ग्राममपंचायतीच्या सदस्या गिता लोखंडे,सदस्य श्री राजेंद्र निकम,मंडळाचे अध्यक्ष श्री आनंदराव जवळ, अरूण जवळ,बाबुराव जवळ,सुनिल पाटणे,राजश्री पाटील,योगिता जवळ,राजु पवार,शामराव चव्हाण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments