Ticker

6/recent/ticker-posts

आंतरराज्य टोळी गजाआड

 

 
कराड दि.12 (प्रतिनिधी) कुरिअर डिलिव्हरी बाईची हातचलाखी करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला कराड गुन्हे अन्वेषण शाखेने अटक करून पाच जणांना अटक केली आहे. या पाच आरोपीसह त्यांच्याकडून दोन मोटर कार, एक लॅपटॉप,8 मोबाईल, 14 वेगवेगळी आधार कार्ड, फसवणूकीकरता वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण पाच लाख 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी अभिजीत नितीन मोहीते, यांनी फिर्याद दिली की, दिनांक 4 सप्टेंबर रोजी कराड शहरात एकुण 5 ठिकाणी मोबाईलची ऑर्डर मागवून ऑर्डर स्वीकारताना अर्धे सुट्टे पैस देवून कुरीअर डिलीव्हरी बॉय यांना पैसे मोजण्यात व्यस्त ठेवून ॲमेझॉप पार्सल मधील ऑर्डरचे मोबाईल हातचलाखीने काढून घेवून त्याठिकाणी रिन साबण, व्हिल साबण, पार्ले बिस्कीटचे रिकाम्या बॉक्स मध्ये ठेवून एकूण 1,69,967/- रूपयांची फसवणूक केल्यानूसार गुन्हा दाखल करणेत आलेला होता. 

सदर गुन्ह्याच्या तपासात संशयीत आरोपीना पार्सल मागवण्याकरीता स्वत:चे बोगस पत्ते व बोगस सीमकार्डचा वापर केल्याचे निष्पन्न झालेे. सदर गुन्हा उघड करणे व आरोपीत पकडणे हे कराड पोलीसांस समोर कडवे आव्हाण होते. तांत्रिक माहितीचा अभ्यास करून प्रथम घडलेला प्रकार हा 1, 2 इसमांनी केला नसून त्यामध्ये मोठी टोळी कार्यरत असल्याचे आढळून आले. सदर तपासामध्ये विविध तपास कौशल्यांचा वापर करून कराड डीबी पथकाने संशयीत 05 आरोपीत निष्पन्न केले. 

अटक आरोपी यांचेकेडे केलेल्या तपासामध्ये आरोपी यांनी गुन्ह्याची कबुली देवून प्रथम गुगल वरून आधारकार्ड डाऊनलोड करून ते मोबाईलवर ईडीट करून प्रथम बोगस आधारकाडेर् बनविल्याचे सांगितले. त्यानंतर त्या आधारकार्डांचा वापर करून बोगस सिमकाडेर् खरेदी केली. त्या सीमकार्डांचा वापर करून ॲमेझॉन, फ्लिपकार्ड, रेडमी, विवो स्टोअरवर खाती सुरू करून त्या खात्यांवरून ऑनलाईन ऑर्डर मागवत होते. असा ऑर्डर केलेला मोबाईल मेसेज आल्यानंतर संबंधीत डिलेव्हर बॉयला सुट्टे पैसे मोजण्यास देवून हातचलाखी करून मुळ पार्सलमधील मोबाईल काढून घेवून त्यामध्ये साबणाचा बॉक्स टाकण्यात येत होता. सदरचा साबणाचा बॉक्स टाकत असताना आलेल्या मोबाईल पार्सलचे वजन व बदलून टाकलेल्या साबणाचा बॉक्सचे वजण तंतोतत जुळवले जात होते. 
नमुद गुन्ह्यात एकुण 5 निष्पन्न आरेापी यांना बदलापूर , कल्याण जिल्हा ठाणे येथून अटक केलेले आहे. अटक आरोपी यांचेकडून 2 मोटार कार, 1 लॅपटॉप, 8 मोबाईल, 14 वेगवेगळी आधारकार्ड,व फसवणूकीकरता वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत करण्यात आलेले आहे. आरोपी हे त्यांनी बनविलेल्या बोगस आधारकार्डवरच हॉटेलमध्ये वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी यांचेकडून एकुण 5,26,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. 

आरोपी यांनी या गुन्ह्यासह महाराष्ट्रात पुणे, कल्याण-ठाणे, दादर-मुंबई, नंदुरबार, अलिबाग-रायगड जिल्ह्यात व इतर राज्यात इंदौर-मध्यप्रदेश, भोपाळ-मध्यप्रदेश, कन्नुर-केरळ, गोवा याठिकाणीही असे प्रकार केलेचे कबुली दिलेली आहे. नमुद टोळीतील काही सदस्य उच्चशिक्षित आहेत. ते त्यांना असलेल्या तांत्रिक ज्ञानाच्या वापर करून फसवणूकीचे प्रकार करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. नमुद टोळीचे पुढील टार्गेट उरळीकांचन पुणे होते. तेथेही मोबाईलची पार्सल मागविले होते परंतु त्यापुर्वीच कराड पोलीसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. व फसवणूकीचे साहित्य जप्त केले आहे.


सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. अजीत बोऱ्हाडे सोा, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.श्री. रणजीत पाटील साहेब व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख श्री. अमित बाबर सहा.पोलीस निरीक्षक, सफौ संतोष सपाटे, सतीश जाधव, पोलीस हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे, पोलीस नाईक संजय जाधव, सचिन साळुंखे, मारूती लाटणे, संदीप कुंभार, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, संग्राम पाटील, सुजीत दाभाडे यांनी केलेली आहे. 

या संशियत आरोपी मध्ये 1) रॉबिन ॲन्थांेनी आरोजा वय 26 वर्षे,मुळ रा. घर नंबर 053 कुचेकल कोचीण राज्य केरळ सध्या रा.गणेशकृपा, प्लॅट नंबर 303,जाधव कॉलणी बदलापूर जि. ठाणे, 2) किरण अमृत बनसोडे वय 24 वर्षे,रा.चक्कीनाका,गोसावीपुरा,हाजीमलंग रोड, कल्याण पुर्व 3) राहूल मच्छिंद्र राठोड वय 21 वर्षे,रा.गणेशकृपा,प्लॅट नंबर 303,जाधव कॉलणी बदलापूर, 4) रॉकी दिनेश कर्णे वय 21 वर्षे,रा.काकाढाबा गणेश चौक,मलंगबाब रोड कल्याण जि. ठाणे, 5) गणेश ब्रम्हदेव तिवारी वय 39 वर्षे, रा. भटवाडी घाटकोपर मुंबई
नमुद गुन्ह्यातील आरोपीत यांना शूक्रवारी पहाटे अटक केले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता आज रोजीपर्यंंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सपोनि अमित बाबर हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments