वडूज : रस्त्यावर सापडले ल्या कासवासंमवेत वनरक्षक श्री. जावीर व ल्हासुरने येथिल दोस्ती मंडळाचे कार्यकर्ते
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वडुज:
खटाव तालुक्यातून इंदापूर येथे दुर्गा ज्योत घेऊन जाणाऱ्या युवकांना शिंगणापूर घाटात भर रस्त्यावर एक कासव आढळून आले. युवकांनी ही बाब वनरक्षक बिरु जावीर यांच्या कानावर घातली. त्यांनी रात्री,अपरात्री जाऊन त्या कासवाला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले . याबाबत ची अधिक माहिती अशी,
दोस्ती मित्र मंडळ ८दारे(लासुरणे) ता. इंदापूर जि. पुणे हे औंध (ता.खटाव) येथे यमाई देवी मंदिरातून ज्योत नेण्या करीता येत असताना त्यांना शिंगणापूर( ता.माण ) येथील घाट सेकशन मध्ये कासव रस्त्यावर आढळले असता त्यांनी श्री.जावीर यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून ते कासव रात्री 1.10 वाजता वडूज दहिवडी चौक येथे ताब्यात दिले ते कासव त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले वन्यजीव सप्ताह मध्ये एखादया प्राण्याचा जीव वाचवल्याबद्दल मनस्वी समाधान झाल्याचे श्री. जावीर यांनी सांगितले .
0 Comments