Ticker

6/recent/ticker-posts

व्यापाऱ्याच्या सतर्कतेने मायणीत दरोड्याचा प्रयत्न फसला, बाजारपेठेत भीतीचे वातावरण

मायणी: सराफ दुकानावर गुरुवार रात्री ८ वाजता दरोडा टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना दरोडेखोर.
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मायणी: दत्ता कोळी
 येथील मुख्य बाजारपेठेतील यशवंत बाबा मंदिर परिसरातील सोनाचांदीच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला.दुकान मालकाने प्रसंगावधान दाखवताना केलेल्या विरोधामुळे दरोडेखोरांना पलायन करावे लागले. या घटनेदरम्यान दरोडेखोरांनी दुकान मालकावर बंदूक ताणल्याचा विडिओ व्हायरल झाल्याने बाजारपेठेतभीतीचे वातावरण पसरले आहे.
 या घटनेबाबत व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही व्हिडिओद्वारे व दुकानदारांकडून मिळालेली माहिती अशी, येथील बालाजी ज्वेलर्स चे मालक अमित माने हे आपल्या सोना चांदी दुकानात गुरुवार रात्री ८ .३०वाजल्याच्या सुमारास हिशोबाने काम करीत बसले असता काही युवकांनी तोंडाला रुमाल बांधून दुकानात प्रवेश केला. व चर्चा करताना दुकान मालकाच्या कॉलरला पकडून बंदूक दाखवून धमकवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान दुकान मालकाने आरडाओरडा करीत दरोडेखोरांना प्रतिकार केल्याने दरोडेखोरांना दुकानातून पलायन करावे लागले. 
 यादरम्यान दुकान मालकानी व ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.परंतु चोरटे पलायन करण्यात यशस्वी झाले. मुख्य पेठेतील सराफ दुकानावर अशाप्रकारे झालेला चोरीचा प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली.
 तातडीने घटनास्थळी पोलीस पाटील प्रशांत कोळी दाखल झाले.व ताबडतोब पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलीस स्टेशनमध्ये झालेली नव्हती.

Post a Comment

0 Comments