Ticker

6/recent/ticker-posts

वाठार पोलिसांची गुटख्यावर धडाकेबाज कारवाई, १२ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त

शुभम गुरव 
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
आसनगाव
दिनांक ०८/१०/२०२१ रोजी वाठार पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्यपणे गुटख्याचा साठा केल्याची मा . उपविभागीय पोलीस अधिकारी , कोरेगाव विभागाचे श्री . गणेश किंद्रे सो यांना त्याचे बातमीदारामार्फत खात्रिशीर बातमी मिळालेने त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभाग सातारा यांचे अधिकारी यांना संपर्क करुन बोलावुन घेवुन मा . श्री . अजयकुमार बन्सल सो पोलीस अधीक्षक सातारा श्री . अजित बो - हाडे सो , पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री . गणेश किंद्रे सो व वाठार पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमंलदार , दोन पंच यांनी मौजे पिपोडे बुगा व पिंपोडे खुर्द गावचे हद्दीत जावुन संयुक्तपणे छापा टाकला असता पिंपोडे बु येथील १ ) जितेंद्र नारायण पवार २ ) दादा नारायण पवार याचे किराणा दुकानाचे पाठीमागे पत्र्याचे शेड मध्ये प्रतिबंधीत गुटखा व पान मसाला असा एकुण किं रु २,३१,६१८ / - रुपयाचा माल मिळुन आला तसेच पिंपोडे खुर्द येथील संतोष भरत कदम याचे एक्सयुव्ही ५०० गाडी नं एम एच ११ बी.व्ही ६७०० या मध्ये ९ ४,०१८ / रुपयाचा प्रतिबंधीत गुटखा गाडीसह किं रु १०,५४,०१८ / - असा दोन्ही ठिकाणी एकुण १२,८५,६३६ / - रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा व वाहन जप्त करुन त्याचेवर कायदेशीर कारवाई करणेत आलेली आहे . प्रत संपादक .. सदर कार्यवाही ही मा . उपविभागीय पोलीस अधिकारी श्री . गणेश किंद्रे सो , वाठार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदिप बनकर , सहा फौज विष्णु धुमाळ , पो हवा कमलाकर कुंभार , पो.शि साहिल झारी , हेमंत शिंदे , अजय गुरव , तुषार ढोपरे , श्रीकांत खरात तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे श्री . अनिल पवार व आर . आर . शहा यांनी सहभाग घेतला असुन पुढील तपास वाठार पोलीस स्टेशनचे सहा . पोलीस निरीक्षक श्री . संजय बोंबले व पोउनि श्री . संदिप बनकर हे करीत आहेत .

Post a Comment

0 Comments