सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
गोंदवले
वावरहिरे ता.माण तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली
जाते. परिसरातील वाड्यावस्त्या अन गावचा कारभार वावरहिरे ग्रामपंचायतीच्या
माध्यमातून चालतो.परंतु येथील वाड्या वस्त्या अद्यापही विकासापासून वंचित
असल्याने वावरहिरे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
गावातील अनेक रस्ते आमदार किंवा खासदार फंडातून झालेत,मग
ग्रामपंचायतीमध्ये आलेला निधी गेला कुठं? या सवालासह गावातील अनेक
प्रश्नांवर लोक बोलू लागली आहेत. वाड्या-वस्त्यांवर जास्तीत जास्त
रस्त्याच्या बाजूला असलेल्या खांबावर बल्ब बसवणे आवश्यक आहे,पण एवढा येणारा
निधी त्यातून गावातील झालेली शून्य कामे,मग सध्या ग्रामप्रशासक व
त्यांच्या टीमची एवढी पण ऐपत नसल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले असल्याने
ग्रामस्थ ग्रामपंचायतीविरोधात आंदोलनाच्या भूमिकेत आहेत.
गावात अनेक गटारे अशी आहेत की आजही उघडी आहेत,यातून अनेक प्रकारचे
डास किंवा कीटक यांचा उपद्रव गावकऱ्यांना होतोय,त्याचबरोबर या गटारातील
सांडपाणी हे थेट रस्त्यावरून वाहत जावून पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याने
गावातील लोकांना साथीच्या आजाराची संभवता जास्त आहे,हे सगळं दिसून पण आणि
वारंवार निदर्शनास आणून देऊन पण यावर कोणतीच कार्यवाही ग्रामपंचायतीमार्फत
होताना दिसत नाही.त्यामुळं आलेला निधी हा गावासाठी न वापरता सत्ताधारी हे
आपल्या खिशात तर घालत नाहीत ना,असे प्रश्न उठताना दिसत आहेत.गावातील मूलभूत
गरजा किंवा अन्य कोणत्या सुविधादेखील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण
होत नाहीत मग गावात असणारी घरपट्टी, पाणीपट्टी का भरायची?असा सवालही
ग्रामस्थ विचारत आहेत.येत्या काळात जर गावातील अडचणी ग्राम पंचायतीच्या
माध्यमातून सोडवल्या गेल्या नाहीत तर येत्या काळात ग्रामपंचायती समोर
ग्रामपंचायतीच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय गावाला घ्यावा लागणार
असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
येत्या काळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जर गावातील अडचणी सोडवल्या गेल्या नाहीत तर ग्रामस्थांसोबत यशवंत सेनेच्या माध्यमातून गावचा नागरिक या नात्याने आम्हीसुद्धा या आंदोलनात उतरू,आणि हे दळभद्री ग्रामप्रशासन बदलण्यासाठी सुशिक्षित युवकांची मजबूत फळी तयार करून हे नाक्षर सत्ताधारी पदावरून हाकलून देऊ.
- एकनाथ वाघमोडे, ग्रामस्थ व सचिव यशवंत सेना माण तालुका!
0 Comments