Ticker

6/recent/ticker-posts

म्हसवड पोलिसांना आरोपी सापडेना

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
गोंदवले: अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी मोकाट असल्याचा आरोप करत माण तालुक्यातील पानवण येथील मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. यासंदर्भात निवेदन देऊन आरोपीस अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. 
एकीकडे संपूर्ण देशात स्त्री सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा मानला जात असताना आजही अनेक स्त्री, मुलींवर अन्याय अत्याचाराच्या घटना सतत घडत आहेत.त्यातच भर म्हणून माण तालुक्यात पानवन येथे राहुल नरळे या आरोपीच्या त्रासाला कंटाळून दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. दिनांक २३/१०/२०२१ रोजी दुपारी सुमारे ०२:४५ च्या सुमारास ही घटना घडल्यानंतर म्हसवड पोलिसांनी वेगवेगळी कारणे देत सदर गुन्हा नोंद करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला. तसेच गुन्हा दाखल होऊनदेखील आरोपी आरोपी हा मोकाट फिरत असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

आरोपी हा आम्हाला काही सापडत नाही, तो आरोपी तुम्ही आम्हाला आणून आमच्या ताब्यात द्या, अस म्हसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक श्री.ढेकळे म्हणाल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला असून न्याय मिळावा, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.  पोलिसांच्या या कुचकामी धोरणाविरुद्ध जनमानसातून तीव्र संताप व्यक्त होतोय.यावरून आता म्हसवड पोलीस आता मयत अल्पवयीन तरुणीस न्याय देणार की गुन्हेगारी प्रवृत्तीला असच पाठबळ देत राहणार,असा सवालही या घटनेविरुद्ध संताप व्यक्त होताना उठत आहे.

विश्वास राहणार नाही
ज्यांच्याकडे सुरक्षा व न्याय मागायचा त्यांनीच गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालून अन्यायग्रस्तांना न्यायापासून वंचित ठेवायचं, अशीच जर धोरणे पोलीस प्रशासन राबवत असेल तर जनतेचा पोलीस प्रशासनावर असलेला विश्वास राहणार नाही, अशी चर्चा सुरू आहे. 

Post a Comment

0 Comments