Ticker

6/recent/ticker-posts

दहिवडीत आरक्षणामुळे अनेकांची गोची

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
दहिवडी: आज झालेल्या नगरपंचायतीच्या आरक्षण सोडतीने विद्यमानसह सर्व माजी नगराध्यक्षांची गोची झाली असून बहुतांशी सर्व नेतेमंडळींचे प्रभाग आरक्षित झाले आहेत.

विद्यमान नगराध्यक्ष धनाजी जाधव निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये अनुसुचित जाती महिला हे आरक्षण पडल्याने त्यांना नवीन प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यांचा मुळ प्रभाग क्रमांक ३ हा सर्वसाधारणसाठी आरक्षित झाल्याने तिथून ते निवडणूक लढवू शकतात. प्रथम नगराध्यक्षा साधना गुंडगे यांचा प्रभाग क्रमांक १५ अनुसुचित जातीसाठी आरक्षित झाल्याने त्यांच्यासह त्यांचे पती सिध्दार्थ गुंडगे यांची अडचण झाली आहे. 

तसेच माजी नगराध्यक्ष दिलीप जाधव व सतीश जाधव यांचे प्रभाग क्रमांक १० व १४ हे अनुक्रमे सर्वसाधारण महिला व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित झाले आहेत. दिलीप जाधव हे घरातील महिलेला संधी देवू शकतात. पण सतीश जाधव यांना नवीन ठिकाणी नशीब अजमावे लागेल. यासोबतच विरोधी पक्षनेते बाळासाहेब गुंडगे यांचा प्रभाग क्रमांक ८ हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने त्यांच्यासमोर सुध्दा समस्या निर्माण झाली आहे. तर अजित पवार यांचा प्रभाग क्रमांक १७ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला साठी आरक्षित झाल्यामुळे त्यांना थांबावे लागणार आहे.

Post a Comment

0 Comments