Ticker

6/recent/ticker-posts

वरकुटे मलवडीत सख्ख्या भावाचा खून



वरकुटे - मलवडी

शेतातील ज्वारीच्या पिकाला पाणी द्यायला मनाई केल्याचा राग मनात धरून वरकुटे-मलवडी ता.माण येथील वाघमोडे वस्तीवर राहणाऱ्या आण्णा धुळा वाघमोडे वय ७५ वर्षे यांचा त्यांचे सख्खे भाऊ,मारूती धुळा वाघमोडे व आबा मारुती वाघमोडे यांनी शेतातच रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास काठी व धारदार शस्त्राने हल्ला करून निघृण खून केल्याची घटना वरकुटे-मलवडीत घडली आहे.

याबाबत म्हसवड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वरकुटे-मलवडी गांवचे हद्यीत पोळ-फडतरे वस्तीच्या बंधाऱ्यानजीक गावंदर नावच्या शिवारात मयत आण्णा वाघमोडे यांच्या मालकीच्या ज्वारीच्या पिकाला पाणी पाजणेकरीता गेले होते. लाईट रात्रौ २:०० वाजता येणार असल्याने ते ज्वारीच्या शेतातच झोपले असतांना मारुती वाघमोडे व आबा वाघमोडे यांनी तेथे जावुन झोपेतून उठवुन आम्हांला शेतातुन पाणी नेहुन दे असे विचारले असता, वडील (बापु) यांनी त्यास नकार दिलेचा राग धरुन दोघांनी संगनमताने त्याचेकडील असलेले कु-हाड, दगड, व काठीने मारहाण करुन गंभीर जखमी करुन त्यांचा खुन केला आहे.अशी फिर्याद सदाशिव अण्णा वाघमोडे यांनी मसवड पोलिसात दिली आहे.याबाबत मसवड पोलिस ठाण्यात गुर नं 203/2021 Ipc 302,34 नुसार गुन्ह्याची तक्रार नोंद झाली असून,डी.वाय एस पी निलेश देशमुख,व म्हसवडचे सपोनी बाजीराव ढेकळे यांनी घटनास्थळी भेट देऊन,पंचनामा केला व आरोपी मारुती वाघमोडे आबा वाघमोडे यांना ताब्यात घेतले आहे.श्वान पथकाच्या साहाय्याने तपास केेला असूून,गुन्ह्यात वापरलेली शस्त्रास्त्रेही पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत.ऐन दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांत रात्रीच्या भयाण शांततेत दोन सख्ख्या भावांमध्ये शेतीपाण्याच्या कारणावरून शेतात घडलेल्या भांंडणात खून झाल्याच्या घटनेने वरकुटे-मलवडीत घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक तपास मसवडचे पोलीस ठाण्याचे सपोनि बाजीराव ढेकळे करीत आहेत....

Post a Comment

0 Comments