Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा : प्रा बंडा गोडसे

वडूज
प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत खटाव तालुका सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवाची नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. एन. एस. उर्फ बंडा गोडसे यांनी दिला.
याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत दिलेली अधिक माहिती अशी, जिल्हा बँक निवडणूकीत एकाच उमेदवाराला वारंवार संधी नको व त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे पक्षाने निमसोडचे युवा नेते नंदकुमार मोरे यांना पक्षाचे अधिकृत उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीसाठी आपल्यासह तालुक्यातील राष्ट्रवादीच्या काही मान्यवर पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना लेखी पत्र दिले होते. त्यावेळी पक्षाबरोबर बहुतांशी सोसायटी प्रतिनिधींचे ठराव असल्याची खात्री होती. श्री. मोरे यांनी त्यांच्या ताकदीनुसार चांगली  लढत दिली. मात्र त्यांची उमेदवारी  पक्षातील काही लोकांना रूचली नाही. त्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे मोरे यांचा पराभव झाला.  या गोष्टीचा आपणास मनस्वी उबग आला आहे. त्यामुळे आपण आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे देणार आहोत. नजीकच्या काळात पक्षात सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून रहायचे की इतर पक्षीय भूमिका स्विकारायची याबाबत आपले सहकारी मित्र, हितचिंतकांशी चर्चा, विचार विनीमय करुन निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments