Ticker

6/recent/ticker-posts

दहीवडीनजिक अपघातात दोघे ठार

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
गोंदवले: रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दहिवडीजवळ  झालेल्या स्विफ्ट कार  व ट्रकच्या भीषण अपघातात दहिवडीतील दोघे जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला.
याबाबतची माहिती अशी, दहिवडीतील पियुष शैलेंद्र खरात (वय 22), स्वयंम सुशिल खरात (वय 16) व अक्षय दीपक खरात हे तिघेजण रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कारमधून फलटण बाजूकडून दहिवडीला येत होते, तर त्याचवेळी एक ट्रक दहिवडी बाजूकडून फलटणच्या दिशेने चालला होता.
-फलटण रस्त्यावरील हिंदुस्थान पेट्रोलियम पंपासमोरील  वळणावर या दोन्ही गाड्यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात पियुष व स्वयंम हे जागीच ठार झाले, तर अक्षय गंभीर जखमी झाला आहे.

Post a Comment

0 Comments