Ticker

6/recent/ticker-posts

देशमुखांना म्हणे ‘लोधवड्याचं बेणं’, आमदार गोरेंची जीभ घसरली.

विशेष प्रतिनिधी
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
बिजवडी:
जिहे कटापूरच्या पाण्याच काय झालं अस म्हणत.. लोधवड्याचा बेशरम गडी आमच्याच कामांचे भूमीपूजन करत सुटलाय’, अशा शब्दांत निवृत्त आयुक्तांवर टीका केल्याने आमदार जयकुमार गोरे यांची उत्साहाच्या भरात जीभ घसरल्याची टीका होत असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
बिजवडी ता.माण येथे झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.  आमदार जयकुमार गोरे म्हणाले, 7 जून 2019 ला या रस्त्याला मान्यता मिळालीय.त्यावेळी अजित पवार सत्तेत होते का अन हे लोधवड्याच बेणं कुठं होतं..अन आता लहान पोरगं सांगतय म्हणून या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करायला आले.त्यांना थोडीतरी लाज वाटयाला हवी होती. त्या पोरानं ही आपली लायकी ओळखून वागावं व बोलावं. देशमुखांना माझा इशारा आहे आपल्या आवाक्यात आहे तेवढच करा. भुरट्यांच्या नादाला लागून चुकीचे धंदे करू नका. आपल्या उंचीन रहा मी बोललो तर तुम्हाला सहन होणार नाही.   कोरोनाच्या काळात  या देशमुखांना त्यांच्या मँडमनी पुण्यातनं सोडलच नाही.तुम्हाला 88 हजार लोकांनी मत दिली होती जीवघेण्या संकटात तुम्ही घरी बसला. अन कोरोना कमी झाला की मग साहेब कुठल्यातरी एमआयडीसीचे किट घेऊन आले अन ते वाटू लागले हे तुमचे जनतेविषयीचे प्रेम.

‘त्यातलं बरंच वांझुटं’

विधानसभा निवडणूकीवेळी जयकुमारच आता काही खर नाही म्हणत आमच ठरलंय म्हणून 27 गडी एकत्र आलते. त्यातल बरच वाझूंटही होत, अशी घणाघाती टीकाही आमदार गोरेंनी केली.
विरोधकांवर टीका करणं लोकशाहीत गैर नाही. मात्र, एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यक़र्त्यांमधून आमदार गोरेंविषयी संताप व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments