फलटण
फलटण येथील एका उद्योजकास मारहाण केल्या प्रकरणी नगरसेवक
पांडुरंग गुंजवटे व अभिजित जानकर यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
फलटण
शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 2 डिसेंबर रोजी
दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सागर सुधीर शहा (वय 36 रा. गोळीबार
मैदान फलटण) हे शहरात चालू असलेल्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी गेले
असता पांडुरंग गुंजवटे यांनी ऑफिस मध्ये बोलावले फिर्यादी शहा यांना
शिवीगाळ केली यानंतर फिर्यादी तेथून निघून माझ्या गाडीतून ऑफिसला गेले नंतर
पांडुरंग गुंजवटे यांनी पुन्हा फोन वर शिवीगाळ केली.
दुपारी
2 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शहा नगरपरीषद येथे गेले असता
नगरपरीषदेच्या पार्कीग समोर गाडी लावून खाली उतरत असता त्यावेळी अभिजीत
जानकर व पांडुरंग गुंजवटे हे पळत फिर्यादी यांच्याकडे आले अभिजीत जानक याने
चाकू सारख्या हत्याराने वर केला व पांडुरंग गुंजवटे यांनी गचुंडे धरून
हाताने मारहाण केली व त्याचवेळी पांडुरंग गुंजवटे यांनी लोखंडी गजाने
डोक्यात उजव्या बाजूला मारहाण केली अशी फिर्याद सागर शहा यांनी दिली असून
नगरसेवक पांडुरंग गुंजवटे व अभिजित जानकर यांच्या विरोधात शहर पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पो.उपनिरीक्षक
कदम करीत आहेत. सागर शहा यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
0 Comments