Ticker

6/recent/ticker-posts

कष्टाने तारले अन् पावसाने मारले,: द्राक्ष बागांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी

सत्य सह्याद्री
देवापूर

माण तालुक्यात पावसाने अन् शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने फुलवलेल्या शेतशिवारावर अस्मानी संकटाने कहर केला आहे. हातातोंडाशी आलेल्या द्राक्ष बागांचे डोळ्यांदेखत नुकसान होताना पाहण्याचे दुर्भाग्य शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे. पावसाच्या रिपरिपमुळे द्राक्षाच्या मन्याला क्रकिंग होऊन देवापूर, पलसावडे, काळचौंडी, जांभुळणी ढोकमोडा, हिंगणी , विरळी व कूकुडवाड परिसरात झालेले नुकसान शेतकरी बांधवांना खाईत लोटणारे ठरले. सोसायटी च्या माध्यमातून लाखो रुपयांची कर्जे घेऊन , प्रसंगी सोने गहाण ठेऊन द्राक्ष बागा फुलवल्या होत्या. हेच हिरवे सोने द्राक्ष शेतकरी बांधवांना जगण्याच्या आशेचा किरण ठरणार असतानाच पावसामुळे होत्याचे नव्हते झाले आहे
कोट्यवधीचे नुकसान शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून बळीराजा अस्मानी व सुलतानी अशा दोन्ही संकटांना बळी पडत आहे. एकीकडे राज्य शासन फळबागा करण्याचे आवाहन करते, मात्र दुसरीकडे निसर्ग साथ देत नाही, अशात दुष्काळी पट्ट्यातील फळ बाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी नक्की करायचे काय? तूट पुंज्या रकमेवर शासनाची मदत खरंच या शेतकऱ्यांना ऊर्जितावस्था आणून देईल का? हा यक्ष प्रश्न असला तरी फळ बाग व्यवसायाला शासनाच्या मदतीने चालना मिळण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाने द्राक्ष बागांचे तत्काळ पंचनामे करून तूट पुंजी मदत न देता भरघोस मदत देऊन शेतकऱ्यांना ऊर्जितावस्था आणण्याची गरज निर्माण झाली आहे, मा. जिल्हाधिकारी यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी करत आहेत.

शासनाने तातडीने पंचनामे करावेत

गेल्या दोन वर्षांपासून कोविडचे संकट आणि आता शेतीतील नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशीच झाली आहे. दागदागिने गहाण ठेऊन ,उसनवारी करून लाखो रुपयांचा खर्च केला आहे आणि आता हातातोंडाशी आलेला घास गेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे.  या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ दिलासा द्यावा.
विक्रम शिंगाडे, अध्यक्ष माण युवक राष्ट्रवादी माण

पावसाने घात केला

आम्ही शेतकरी ३-४ वर्षांपासून द्राक्षशेती करत आहे. यंदा ही द्राक्ष बागेसाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केला. या  गुरुवारी  बागेत व्यापारी येणार होते. मात्र बुधवारच्या कालोख्यातील पावसाने घात केला. द्राक्षांच्या घडात पावसाचे पाणी शिरल्याने द्राक्षाला तडे पडले आहेत. सकाळपासून हे घड काढून फेकत आहे. . शासनाने नुकसानीची पाहणी करावी. पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई लवकर द्यावी.’’
शहाजी बाबर, द्राक्ष बागायतदार शेतकरी

Post a Comment

0 Comments