Ticker

6/recent/ticker-posts

सातारच्या दोन वाड्यांच्या साठमारीत निष्ठावंत भाजपची ‘घुसमट’



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा:
  नगरपालिकेची आगामी निवडणूक पक्ष नव्हे तर आघाडीवरच होणार असून त्याबाबतची धोरणे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांनी स्पष्ट केली आहेत. दोन्ही निवडणुकीस दोन्ही नेत्यांच्या निवडणुकीसाठीची धोरणे भूमिका स्पष्ट असल्याने निवडणुकीत आता भारतीय जनता पक्षाची विभागणी मात्र दोन वाड्यात होणार असल्याने निष्ठावंत भाजपची ‘घुसमट’ होणार हे नक्की आहे.
पालिकेच्या मागील निवडणुकीत सातारा विकास आघाडीने सातारा पालिकेची सत्ता एक हत्ती आपल्या ताब्यात घेतली सत्तेच्या जोरावर ‘साविआ’ आणि सभागृहात नगर विकास आघाडीची शक्य तिथे आणि शक्य तितकी नाकेबंदी करण्यात यश मिळवले सत्तेसाठीची जोडणी बांधणी करत असावी याची राजकीय समीकरणे सुरू असतानाच विधान सभा निवडणुकीची घोषणा झाली. विकासाच्या मुद्द्यावर आमदार भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला.चार महिन्यापूर्वी राष्ट्रवादीतून लोकसभेत पोहोचलेल्या उदयनराजेंनी ह खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.
यानंतर झालेल्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीत शिवेंद्रसिंह विजयी झाले तर पक्षांतर्गत उदयनराजे यांचा पराभव झाला .पराभवानंतर भाजपने उदयनराजेंचे पुनर्वसन राज्यसभेत करत पुन्हा एकदा त्यांना खासदारकी बहाल केली.
पदाधिकार्‍यांची अपेक्षा फोल
दोन्ही नेते भाजपमध्येच असल्याने सातारा शहरातील भाजप फुल चार्ज झाली होती. त्यामुळे येथील प्रत्येक निवडणूक ते दोघे पक्षाच्या माध्यमातून लढवतील अशी भाजपा कार्यकर्त्यांची व स्थानिक पदाधिकार्‍यांच्या अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षा नंतरच्या काळात फोल ठरली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही दोन्ही राजांच्या गळाभेटी,  डाव-प्रतिडाव जिल्ह्यात चर्चेला राहिले बिनविरोध निवड झाल्यानंतरही उदयनराजेंनी शिवेंद्रसिंह यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर काहीच दिवसात राष्ट्रीय राजकारणात पक्ष आवश्यक असला तरी स्थानिक पातळीवरील समतोल कायम राखण्यासाठी आघाडीचीच आवश्यकता असल्याचे दोन्ही नेत्यांनी आपल्या कृतीतून भाजपच्या नेत्यांना दाखवून दिले.
अलीकडच्या काळात आघाडीचे वर्चस्व वाढविण्यासाठी दोन्ही नेत्यांनी प्रयत्न करत नाही एकमेकांवर टोकाचे आरोप प्रत्यारोप सुरु केले नेत्यांच्या या वक्तव्यावरून तसेच अंतर्गत घडामोडी मुळे पालिकेची निवडणूक आघाडीवर होणार हे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. त्यात प्रमाणे आता दोन्ही आघाड्यांचे कार्यकर्तेही आपल्या तलवारी उपसू लागले आहेत.
भाजपचे स्वबळाचे स्वप्नच राहणार
दोन्ही नेत्यांची भूमिका ही भाजपाची स्वबळाची स्वप्ने धुळीस मिळवणारी दिसून येत आहेत. त्यामुळे सातार्‍यातील भाजप जिवंत ठेवणारे कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांची सातारा पालिकेच्या निवडणुकीत दोन्ही नेत्यात प्रत्येकाच्या आवडीनुसार विभागणी होणार हेच दिसून येत आहे.
सातारा पालिकेत भाजपाचे सध्या सहा नगरसेवक आहेत. दोन्ही राजे भाजपमध्येच असल्यामुळे सहा नगरसेवकांची आणि त्यांच्या पाठीराख्यांची विभागणी देखील सोयीसवडीनुसार दोन्ही वाड्यात झाल्याचे यापूर्वी अनेक वेळा दिसून आले आहे. पक्षीय पातळीवर निवडणूक लढण्यास उमेदवार निश्‍चितीच्या वेळी वरिष्ठांकडून अनावश्यक हस्तक्षेप होऊ शकतो आणि पक्षीय विचारसरणीमुळे शहरातील बांधणी ढिली होऊ शकते. या भावनेतून येत्या निवडणुकीत मध्ये आघाडीवर लढण्याचा दोन्ही नेत्यांचा निर्णय झाल्याची माहिती समर्थक देत आहेत.
मात्र, सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या घडामोडी नंतर आमदार शशिकांत शिंदे यांनीही सातारा पालिकेच्या निवडणुकीत सक्षम पर्याय उभा करत तिसरी आघाडी बनवण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे आता सातार्‍यामध्ये आमदार शिंदे या पालिकेच्या निवडणुकीत ताकदीने प्रयत्न करणार आणि निवडणुकीचे चित्र बदलणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

Post a Comment

0 Comments