छायाचित्र.. दहिवडी पोलीस स्टेशन ला निवेदन देताना पत्रकार संघटना..
सत्यसह्याद्री प्रतिनिधी / माण
वाळू चोरीची बातमी का लावली म्हणून दैनिक सत्य सह्याद्रीचे गोंदवले प्रतिनिधी नवनाथ बाळू भिसे यांना गोंदवले बुद्रुक येथील संजय कांबळे या व्यक्तीने फोनवरून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली.
दैनिक सत्यसह्याद्री वृतपत्रात वाकी ता. माण येथील माणगंगा नदीपात्रात
वाळूचोरांनी नदीपात्र हपसले आहे. राजरोसपणे वाळू चोरी सुरु आहे हे चित्र दाखवले त्यामुळे वाळूचोरांचे धाबे दणानले आहेत.
सदर व्यक्तीचे वाळूचोराशी आणि महसूल विभागाचे लागेबांधे असल्याची चर्चा चालू आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने वाळू चोराच्या बाजूने पत्रकारास धमकावले असण्याची शक्यता आहे.
सदर व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी दहिवडी पोलीस स्टेशन ला पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले..
0 Comments