Ticker

6/recent/ticker-posts

तालुक्यात सरकार फक्त जयकुमार गोरे

 

शिखरशिंगणापूर
१ कोटी ६० लाख एवढा भरीव निधी शिंगणापूर साठी मंजूर केला.याचे कारण वर कोणतेही सरकार असू देत.इथं तालुक्यात सरकार फक्त आणि फक्त जयकुमार गोरे यांचेच असते. म्हनून हे शक्य झाले.चांगला विकास करणारी माणस निवडा,आम्ही विकासासाठी आहोत. हे सांगून राष्ट्रवादी हा विकासाचा पक्ष नसून फक्त, भांडण लावणारा पक्ष असल्याची घणाघाती टीका आ जयकुमार गोरे यांनी शिंगणापूर येथील जाहीर सभेत केली. शिंगणापूर येथे मंजूर १कोटी ६० लाखविकास कामाचे भूमिपूजन आ जयकुमार गोरे यांचे हस्ते करण्यात आले.
        या जाहीर सभेस जि प सदस्य अरुण गोरे, प स सदस्य,सौ रंजना जगदाळे, हरिभाऊ जगदाळे, राजवडीचे माजी सरपंच विठ्ठलराव भोसले, मार्केट कमिटीचे विलासराव देशमुख, शिंगणापूर महिला सरपंच सौ रेश्मा शिंगाडे,उपसरपंच शशिकांत भोसले,राजप्पा पोळ, रांणद चे काका शिंदे, माजी सभापती रमेश कदम, साहेबराव भगत, बाळासाहेब देवकर,नारायण भगत,दत्ता नलवडे,चंद्रकांत वाघ,  महंत संतोषगिरी, प्रकाश सावंत, मोहनराव भोसले,प्रसाद बडवे,चैतन्य बडवे, शैलेश बडवे शिंगणापूर ग्रापंचायत सदस्य व पंचक्रोशीतील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

 मी बोलत नाही करून दाखवतो.       

 मी बोलत नाही करून दाखवतो.माण खटाव मधील पुढाऱ्यांची संख्या बरीच आहे. कोविड मध्ये मात्र एक ही नेता जनते बरोबर दिसला नाही. मी मात्र जिवाची पर्वा न करता.  कोविड सेंटर नुसते उभारले नाही तर ते सक्षम पणे चालविले.  सुमारे पावणे चार हजार रुग्णावर उपचार केले. मात्र आजीबातही त्याची जाहिरात  केली नाही. हे सांगून शिंगणापूर जाहिर सभेत राष्ट्रवादी बरोबरच नाव न घेता शिवसेना नेते शेखर गोरे यांचे वर राज्यात सत्ता असताना १ रुपया ही तालुक्यासाठी आणता आला नाही. निवडणुकीत सुमारे ८८ हजार मते घेतलेल्या जनतेला वाऱ्यावर सोडून हे नेते बनू पहात आहेत अशी टीका ही आ गोरे यांनी केली.
  दुष्काळी तालुक्यातील पाणी, वाढती ऊस शेती, कारखाने, हे माझं कर्तृत्व आहे. आता किरकसाल ,शंभू खेड सारख्या दुर्गम भागात पाईप लाईन ने पाणी पोहचवणार. शिंगणापूर ग्रामपंचायत घेतली आता सोसायटी आफिसही ताब्यात घ्या. असा गर्भित इशारा आमदार जयकुमार गोरे यांनी उपस्थित शिंगणापूर करांना दिला.
शिंगणापूर माजी सरपंच राजाराम बोराटे यांनी उपस्तितांचे स्वागत करून प्रास्तविक केले.या वेळी निवडणूक काळात दिलेल्या वचनपूर्तीचा आज सत्ता आल्याने आनंद होत आहे.हे सांगून भरीव निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल आ गोरे यांना धन्यवाद दिले.भविष्यात शिंगणापूर ला तीर्थक्षेत्र 'अ' दर्जा मिळवून द्यावा.या प्रमुख मागणी बरोबर शंभू महादेव जुना मार्ग दुरुस्ती, भव्य ग्रामसचीवालय, ठोबंरेवडी स्लॅब स्मशानभूमी, आणि वंचीतउत्तरमानसाठी पाणी मागणी केली. या वेळी ग्रामपंचायत सदस्य डॉ बंदुके यांनी ही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बोराटे यांनी केले.तर आभार ग्रा प सदस्य राजेंद्र पिसे यांनी मानले

Post a Comment

0 Comments