सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
देवापूर/म्हसवड: महाराष्ट्र प्रदेश पश्चिम विभाग किसान काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी प्रा. विश्वंभर सोपान बाबर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे .
ऑल इंडिया किसान काँगेसचे समन्वयक व पश्चिम महाराष्ट्र किसान काँग्रेसचे प्रभारी प्रकाश घाळे यांच्या पत्रान्वये प्रा. विश्वंभर बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे हस्ते तसेच ऑल इंडिया किसान काँग्रेसचे समन्वयक प्रकाश घाळे राज्य सचिव देवाजी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे प्रा. बाबर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
शेतकरी हिताची व संघर्षाची भूमिका घेऊन काँग्रेस पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवून किसान काँग्रेस मजबूत करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी यावेळी केले. प्रा. विश्वंभर बाबर एम. एस्सी अॅग्री उच्च विद्याविभूषित असून त्यांना महाराष्ट्र राज्यस्तरावरील वनश्री पुरस्कार शेतीमित्र पुरस्कार व कृषी क्षेत्रातील सर्वोच्च कृषीरत्न पुरस्कार मिळाला असल्यामुळे ते किसान काँग्रेसला न्याय देतील व आदर्श शेतकर्यांचे संघटन वाढवतील अशी अपेक्षा प्रकाश घाळे यांनी व्यक्त केली.
पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री राष्ट्रीय नेते पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने दिलेल्या संधीचे सोनं करणार असल्याचा निर्धार विश्वंभर बाबर यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राज्य सरचिटणीस देवानंद पवार रणजितसिंह देशमुख व राजेंद्र शेलार किसान काँग्रेसचे पश्चिम चे अध्यक्ष प्रा. संदीप साठे सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव युवक काँग्रेस अध्यक्ष विराज शिंदे तसेच जिल्हास्तरावरील तसेच माण तालुक्यातील अनेक मान्यवर पदाधिकार्यांनी प्रा. विश्वंभर बाबर यांचे अभिनंदन केले.
0 Comments