Ticker

6/recent/ticker-posts

शिष्यवृत्तीत परीक्षेत सातारा जिल्ह्याचा डंका


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती पाजरक्षेत सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा राज्याच्या गुणवत्ता यादीत डंका वाजला आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (5 वी) शहरी विभागात स्वराज चव्हाण राज्यात पहिला तर पूर्व माध्यामिक शिष्यवृत्ती परीक्षेत (8 वी) शर्वरी हरीष पाटणे ही ग्रामीण विभागात राज्यात अकरावी व जिल्ह्यात पाजहली आली. ग्रामीण विभागात (5वी) सिध्दी गंगतीरे राज्यात सहावी तर जिल्ह्यात पहिली आली. शहरी विभागात (8 वी) अनुजा यादव राज्यात तिसरी तर जिल्ह्यात पहिली आली. दरम्यान, या परीक्षेत जिल्ह्यातील एकूण 53 विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
ऑगस्ट 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा शुक्रवार, दि. 7 रोजी निकाल जाहीर झाला. या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील 53 विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यामध्ये शहरी विभागातील 38 व ग्रामीण विभागातील 15 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
  आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागात गुरूकुल प्रायमरी स्कूलच्या शर्वरी हरीष पाटणे हिने राज्याच्या गुणवत्ता यादीत 11 वा तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिला 89.26 टक्के गुण मिळाले. याचबरोबर बनवडी येथील जागृती विद्यामंदिराचा साहिल लाडेने 18 वा, निळेश्‍वर माध्यमिक विद्यालयाच्या ज्योती गरवारेने 23 वा, देऊर येथील मुधाईदेवी विद्यामांजदराच्या मानसी पवार हिने 25 वा, नाडे येथील इंग्लिश मीडियम स्कूलच्या साहिल कदमने 26 वा, कोडोली येथील जि. प. शाळेतील मोहिनी शिरसाट हिने 27 वा क्रमांक पटकावला.
आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागात राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत दहिवडी येथील पी. एम. शिंदे कन्या विद्यालयाची अनुजा यादव 3 रा, सातार्‍यातील महाराजा सयाजीराव विद्यालयातील सारंग गुजर 4 था, शंकर घुलेने 26 वा, अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाची अनुष्का गोमटेेने 5 वा, प्रणव काळेने 6 वा, श्रेयस बुवाने 11 वा, वेदांत उरळेने 19 वा,  मलकापूर येथील रोटरी विद्यालयाचा रोहण मणेरने 10 वा, वडूजच्या छत्रपती शिवाजी हायस्कूलची तृप्ती जाधवने 10 वा,  आगाशिवनगरच्या नूतन मराठी शाळेच्या ऐश्‍वर्या शिंदेने 13 वा, वाईच्या द्रविड हायस्कूलच्या पियूष धुरगुडेने 13 वा, हर्षल  सरकने 23 वा, माने देशमुख विद्यालयाची वैष्णवी संकपाळने 17 वा, कराडच्या एस. एम. इंग्लिश मीडियम स्कूलच्या धन्वंतरी साळुंखेने 24 वा, फलटण येथील मुधोजी हायस्कूलच्या सार्थक गावडेने 24 वा, दहिवडीतील महात्मा गांधी विद्यालयाचा श्रीनिवास जाधवने 25 वा क्रमांक पटकावला.
पाचवी शिष्यवृत्ती पाजरक्षेत शहरी विभागात राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत वडूज येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या स्वराज चव्हाण याने प्रथम क्रमांक पटकावला. याचबरोबर वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयातील आदिती तिडके हिने 4 था क्रमांक पटकावला. वडूज येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या अद्विक जाधवने 6 वा, संस्कृती देशमुखने 7 वा, प्रणव ढगे याने 8 वा, पार्थ पाटीलने 10 वा, प्रांजली निकमने 12 वा, आर्यन सुतारने 12 वा, तनिष्का जाधवने 12 वा क्रमांक पटकावला. महाराजा सयाजीराव विद्यालयातील अनिरूध्द गाळवेने 8 वा, वैष्णवी येवलेने 8 वा, अर्जुन शिंदे याने 9 वा क्रमांक पटकावला. फलटण येथील श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामांजदरातील भार्गवी चांडोळेने 9 वा क्रमांक पटकावला. सातार्‍यातील न्यू इंग्लिश स्कूलमधील रमन रंगराज याने 10 वा, लोणंद येथील जि.प. शाळा क्रमांक 1 मुलेमधील अविनाश क्षीरसागरने 10 वा, कोरेगावमधील सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलमधील ओवी मानेने 10वा, दहिवडी येथील महात्मा गांधी विद्यालयातील ओंकार भुजबळने 11 वा, वाई येथील न.प. शाळा क्रमांक 5 मधील स्वामी क्षीरसागरने 11 वा, मेढा येथील जि.प शाळेतील श्रृती चिकणेने 12 वा, श्रेयश कुंभार 12 वा, न.प शाळा क्रमांक 3 मधील राजवीर भुंजेने 12 वा, फलटण येथील मुधोजी हायस्कूलच्या अक्षय पोतदारने 12 वा क्रमांक पटकावला.
  पाचवी शिष्यवृत्ती पाजरक्षेत ग्रामीण विभागात राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत माझेरी पुनर्वाजसत जि.प शाळेतील सिध्दी गंगतीरेने 6 वा, सारखळवाडी जि. प शाळा येथील सुयश पाटीलने 7 वा, बामणवाडी जि. प. शाळेतील आर्या पवारने 8 वा, तापोळा जि. प. प्राथमिक शाळेतील अथर्व राहूरकरने 8 वा, वेदांत जाधवने 10 वा क्रमांक पटकावला. महू येथील जि.प शाळेतील कार्तिकी गोळेने 9 वा, बोरी, ता. खंडाळा येथील जि. प. शाळेतील चैतन्य धायगुडेने 9 वा, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील जयवर्धन भोईटेने 10 वा, कोपर्डे जि.प. प्राथमिक शाळेच्या गायत्री शिंदेने 10 वा क्रमांक पटकावला असल्याची माहिती प्राथाजमक शिक्षणााजधकारी धनंजय चोपडे यांनी दिली.
आठवी ग्रामीण विभागात जिल्ह्यात प्रथम व राज्यात 11 वी आलेली शर्वरी ही  सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे व नगरपालिका शाळा, गोडोलीच्या शिक्षिका   शीतल पाटणे यांची कन्या आहे. गुरूकुल प्रायमरी स्कूल, सातारा या विद्यालयाची ती विद्यार्थिनी असून या यशाबद्दल तिचे गुरूकूल परिवाराकडून व समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments