महाबळेश्वर रहिमतपूर रस्त्याचे काम प्रगती पथावर असून केळघर नंतर मेढा नगरीतील रस्त्याचे काम सुरू आहे.गेल्या दोन महिन्यांपासून संथगतीने चाललेल्या कामाचा वेग वाढला असून नविन आलेले प्रोजेक्ट मॅनेजर श्री सतिष पाटील यांचा मेढा व्यापारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री विलासाबाबा जवळ यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
महाबळेश्वर-रहिमतपूर रस्त्याचे काम सुरू होवून दोन वर्ष झाली आहेत. कोरोनाच्या संकट काळात हे काम ठप्प झाले होते.अतिवृष्टीने तर कहरच केला अनेक अर्धवट पुल व रस्त्यांचे भराव वाहून गेले या सर्व संकटावर मात करीत रोडवेज सोलूशन इंडीया प्रा.लि. कंपनी च्या वतीने काम करण्याचे अग्निदिव्य पार पाडले जात आहे.या रस्त्याचे काम होत असताना अनेक अपघातही घडले.अनेक जण जखमी झाले तर काहींनी प्राणही गमावले.या रस्त्याचे काम होताना शेकडो वर्षांच्या झाडांची कत्तलही झाली. पण कोणतीही नवनिर्मिती होत असताना त्रास आणि किंमत मोजावीच लागते.या कंपनीने जेवढी झाडे काढली त्याच्या तिप्पट झाडे या रस्त्याच्या कडेला लावायला हवीत अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आली.
सध्या रस्त्याच्या कामाच्या वाढलेल्या गतीमुळे व्यापारी वर्ग समाधानी असून प्रोजेक्ट मॅनेजर श्री सतिष पाटील व असिस्टंन मॅनेजर श्री प्रमोद ऊधाजी यांचा वेण्णाचौक येथे व्यापार्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.मेढा नगरीतील रस्ता सिजन पूर्वी पूर्ण करावा अशी मागणीही केली.यावेळी अधिकार्यांनी लवकरच रस्ता पूर्ण करीत असताना दर्जा ही सांभाळावा लागतो असे सांगून व्यापार्यांना अश्वस्थ केले.
या सत्कार प्रसंगी महेश कदम, संपत शिंदे,अरूण मर्ढेकर,संदिप पाडळे,नितीन मगरे, बंडाशेठ मोहळकर, धनंजय मोरे,समिर पवार, ज्ञानेश्वर सावंत,अजित धनावडे,महेश वारागडे, संतोष करंजेकर,मोहन खामकर इ.व्यापारी उपस्थित होते.
0 Comments