Ticker

6/recent/ticker-posts

वाठार स्टेशनला सेवानिवृत्त होणाऱ्या अंमलदाराच्या हस्ते ध्वजारोहण

शुभम गुरव/ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री शंकर गुजर हे 31/01/2022 रोजी पोलिस दलातून सेवानिवृत्त होत आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री शंकर गुजर यांनी पोलिस दलात केलेल्या सेवेचा सन्मान म्हणून वाठार पोलीस ठाण्याचे अधिकारी सपोनि संजय बोंबले व Psi श्री बनकर यांनी आज दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पाच दिवसात सेवानिवृत्त होणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री शंकर गुजर यांच्या हस्ते वाठार पोलीस ठाणे येथे ध्वजारोहण केले तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप बनकर यांनी राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली.वाठार पोलीस स्टेशन यांनी केलेल्या अनोख्या सन्मानसोहळ्यामुळे सर्वत्र वाठार पोलीस ठाणे अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक होत आहे....

Post a Comment

0 Comments