Ticker

6/recent/ticker-posts

‘त्या’ खूनप्रकरणाचा चार तासात छडा, मृत युवती पाटण तालुक्यातील महिंदची,

मारेकरी गजाआड, दाजीला अडकवण्यासाठी मेहुण्याचे कृत्य

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कराड: 
कराड तालुक्यातील कार्वे  येथे निर्जनस्थळी युवतीचा डोक्यात दगड घालून निर्घृळ खून करण्यात आला होता. अत्यंत गुंतागुंतीच्या या खून प्रकरणाचा छडा लावण्यात कराड पोलिसांसह सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. बहिणीला त्रास देणार्‍या दाजीला अडकविण्यासाठी मेहुण्याने हा खून केल्याचे समोर आले आहे. वनिता आत्माराम साळुंखे (वय 30, रा. महिंद, ता. पाटण) असे मृत युवतीचे नाव आहे. तर शरद हणमंत ताटे (वय 30, रा. येरवळे, ता. कराड) असे संशयित आरोपीचे नाव आहे.  
दरम्यान ताटे याला न्यायालयासमोर हजर केले असता 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.  याबाबात माहिती अशी, कार्वे परिसरात भैरवनाथ मंदिराजवळ उसाच्या शेतात सोमवारी तीस वर्षे वयाच्या युवतीचा मृतदेह आढळला होता. युवतीच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याने ओळख पटत नव्हती. पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे, भरत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच खुनाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे  निरीक्षक किशोर धुमाळ यांना तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या. त्यानुसार सहाय्यक  निरीक्षक रमेश गर्जे व  उपाजनरीक्षक गणेश वाघ हे स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले.
 घटनास्थळाचा पंचनामा करत असताना मृतदेहाजवळ चिठ्ठी, गांजा सापडला होता. त्याआधारे पोाजलसांनी तपासाची सुत्रे फिरवली.  एका व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करून त्याने मला लग्न करतो म्हणून आणले. माझ्याशी संबंध ठेवले व माझ्याबरोबर लग्न करत नसून मला मारहाण करून माझ्याशी संबंध ठेवले आहेत. मी जीव दिला किंवा मला काय झाले तर त्यास तो जबाबदार आहे, असा मजकूर चिठ्ठीत होता. तसेच चिठ्ठीसोबत संबंधिताच्या आधार कार्डची झेरॉक्स  होती. त्या चिठ्ठीच्या आधारे व आधार कार्डवरील नावावरून तपास सुरू केला. त्यावेळी त्यांना  चिठ्ठीजवळ थोडा गांजा मिळून आला. तसेच ज्या व्यक्तीच्या नावाचे आधार कार्ड होते. त्याच्या घरातही गांजा सापडला.  पोलिसांनी चौकशी केेल्यावर घरात गांजा ठेवणाराचे नाव समोर आले. यावरून येरवळेतील शरद हणमंत ताटे याला गाठून पोलिसांनी कसून चौकशी केली.  
सुरूवातीला शरद ताटे याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कौशल्याच्या तपासातून वनिता साळुंखे हिचा खून शरद ताटे यानेच केला असल्याचे स्पष्ट झाले. ताटेला तात्काळ अटक करून पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.  
 या खुनाचा उलगडा करण्यासाठी वरिष्ठांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक रमेश गर्जे,  रेखा दूधभाते,  उपाजनरीक्षक भैरव कांबळे, भरत पाटील, गणेश वाघ यांच्यासह शरद बेबले, साबिर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, रोहीत निकम, विशाल पवार, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, धनंजय कोळी, सज्जन जगताप, उत्तम कोळी, नंदकुमार भोसले, प्रशांत एक्के, सुनंदा कांबळे, मनिषा खराडे, नीलेश कदम, मिलिंद बैले, संजय काटे, अमोल पवार यांच्यासह कराड तालुका पोलीस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जवांनांनी संयुक्त प्रयत्न केले.  
 वनिता साळुंखेला अत्यंत  निर्दयीपणे गळा आवळून संपवण्यात आले. त्यानंतर शरद ताटे याने तिच्या डोक्यात दगड घातला. वनिताचा या प्रकरणात हकनाक बळी गेला. वास्तविक वनिता साळुंखे हिची व संशयियताची फक्त तोंडओळख होती. त्यांचे अनेकदा बोलणे झाले होते. रविवारी ताटे याने वनिताला रात्री साडेआठ वाजता कार्वे येथे निर्जनस्थळी नेले. वनिताचा गळा दाबून खून केला.

Post a Comment

0 Comments