शुभम गुरव, आसनगांव
----------------------------------------
कोरेगांव तालुक्यातील बिचकुले येथे विनापरवाना बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी दुर्घटना घडली असून शर्यतीदरम्यान बैलजोडी विहीरीत पडून दोन बैलांचा मृत्यू झाला आहे.कोरेगाव तालुक्यातील बिचकुले येथे बुधवारी विनापरवाना बैलगाडा शर्यती चालू होत्या.बैलगाडा शर्यती चालू असताना बैलगाडी उधळल्याने बैलगाडी चालकाचा बैलगाडीवरील ताबा सुटला व बैलगाडी विहीरीत जाऊन पडली यामध्ये दोन बैलांचा मृत्यू झाला आहे.याबाबत वाठार पोलिस ठाण्यात संयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना बुधवारी दुपारी 1.00 वाजलेच्या दरम्यान घडली आहे.
0 Comments