सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कळंबे: सातारा पंचायत समितीचे सभापती सरिता इंदलकर यांच्या गावात त्यांच्याच विचारांची ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीमध्ये सर्वसामान्यांवर अन्याय होत आहे. सरपंच, पदाधिकारी, ग्रामसेवक यांनी अधिकाराचा गैरवापर करुन चुकीच्या ठरावाने घराची नोंद केली आहे. सभापतींचे पती संभाजी इंदलकर हे म्हणतात की दोन्ही महाराज हे माझ्या खिशात आहेत. काहीच कोणी करु शकत नाहीत, याची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे बजरंग श्रावण अंबुले यांनी केली आहे.
अंबुले यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कै. श्रावण परशुराम अंबुले यांना कळंबे येथे बक्षिसपत्राने 1963 साली गावठाणातील घर दस्ताप्रमाणे लांबी 75 फुट व रुंदी 17 फुट अशी मिळालेली आहे. मूळ बक्षीस पत्र हे 2017 साली मिळाले. त्यावेळी बक्षिसपत्रात मिळकतक्षेत्राबाबत जागेवरील लांबी 75 फुट व रुंदी 17 फुट समजली. परंतु प्रत्यक्षात चालू मिळकत नं 187 मधील लांबी 68 फुट व रुंदी 12 फुट अशी आहे. परंतु बक्षिसपत्रामध्ये तफावत दिसून आली. त्यामुळे दि. 28 आगस्ट 2017 रोजी कळंबे येथे बक्षिसपत्र म्हणून पुन्हा नोदंवण्याचा अर्ज दिला. त्यानंतर कळंबे ग्रामपंचायतींकडून त्या अर्जावर कोणताही प्रतिसाद दिला नाही. वारंवार पाठपुरावा केला तरीही न्याय मिळाला नाही. उलट ग्रामपंचायत सरपंच, पदाधिकारी तसेच ग्रामसेवक उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शारिरीक मानसिक त्रास होत आहे. हा अर्ज करु नये म्हणून सभापतींचे पती संभाजी इंदलकर हे माजी सरपंच व माजी सरपंच प्रकाश चिंचकर, माजी सरपंच वैशाली इंदलकर यांच्याकडून सतत धमक्या दिल्या जातात. खोट्या अट्रोसिटीमध्ये अडकवण्याची धमकी दिली जात आहे. तसेच सभापतींचे पती संभाजी इंदलकर हे म्हणतात की माझी बायको सभापती आहे. दोन्ही महाराज माझ्या खिशात आहेत. मुख्यमंत्री माझं काही करु शकत नाहीत. अंगणवाडीत भ्रष्टाचार केलेला आहे. दलित वस्ती योजनेत भ्रष्टाचार केला आहे. माझ कोणी काही करु शकत नाही. अशी धमकी दिली जात आहे. याची चौकशी करुन संबधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अंबुले यांनी केलेली आहे.

0 Comments