Ticker

6/recent/ticker-posts

भ्रष्ट अधिकार्‍यांना न सांगता काळे फासणार



चारा छावण्या घोटाळा प्रकरणात दोषी असलेल्या माण तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करावी या मागणीसाठी शिवसेनेचे नेते संजय भोसले यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून अधिकार्‍यांना गनिमी काव्याने काळे फासणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.  
निवेदनात म्हटले आहे की, माण तालुक्यामध्ये चारा छावणी मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला होता. या घोटाळ्याची चौकशी होऊन देखील संबंधित कर्मचारी व दोषींवर कारवाई होत नाही. याबाबत अनेक वेळेला संजय भोसले यांनी आंदोलने करून देखील कारवाई होत नसल्यामुळे अखेर त्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून गरज पडल्यास ते आत्मबलीदान देणार आहेत. याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोणत्याही स्थितीमध्ये आता माघार घेतली जाणार नाही व संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे त्यासाठी आपली आग्रही भूमिका असते कारवाई न झाल्यास आंदोलन सुरूच राहील असे त्यांनी बजावले आहे.

संजय भोसले यांनी पत्रकात म्हटलंय, की चारा छावणीतील भ्रष्टाचाराविरोधात १५ ऑगस्ट २०२० पासून लोकशाही मार्गानं सुरु असलेल्या लढ्याची थट्टा संपूर्ण जिल्हा प्रशासनानं लावलीय. माझ्या तक्रारींबाबत वेळकाढूपणा, चालढकल करुन वारंवार मला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण या सर्वांना पुरुन उरणार आहे. पोलिसांकडून , महसूल विभागाकडून  मला योग्य साथ मिळत नसल्यानं मी न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय घेतला. न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. परंतु खोटी, बनावट कागदपत्रे सादर करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न पुन्हा करण्यात येत आहे.

  या सर्व गेंड्याच्या कातडीच्या निगरगट्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी प्रशासनाची केविलवाणी धडपड सुरु आहे. या सर्वच प्रकाराला आळा बसावा म्हणून मी क्रांतिकारी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आता माझ्या रोषाला या सर्वांना सामोरे जावे लागणार असून यातूनही मला न्याय मिळाला नाही तर मी आत्मबलिदान करणार आहे, असा इशाराही भोसले यांनी दिला आहे.


गृहराज्यमंत्री काय भूमिका घेणार?

दरम्यान, राज्यात सत्ता असूनही सत्ताधार्‍यांवर सुद्धा आंदोलनाची वेळ येत असल्याने मी व्यथित झालो असल्याची खंतही भोसले यांनी सत्य सह्याद्री प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. हा सर्व प्रकार गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनाही माहिती असून या प्रकरणी ते काय भूमिका घेतात, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments