खटाव महसूल विभागात सावळा गोंधळ, तहसिलदारांचे लक्ष नाही
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: गोरेगाव (निमसोड) ता खटाव येथील सरकारी जागेतील विना परवाना गौण खनिज उत्खननाचा पंचनामा चक्क सात महिन्याने करण्यात आला आहे. त्यामुळे खटाव तालुक्यातील महसुल विभागच दस्तुरखुद्द सरपंच व त्यांच्या साथीदारांना पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी की, गोरेगाव ता. खटाव येथील तक्रार करणारे अर्जदार विठ्ठल नामदेव नलवडे, विक्रमराज विठ्ठल डोईफोडे व सहया करणार इतर ग्रामस्थ यांनी गोरेगाव सरपंच सुशीलकुमार डोईफोडे व त्यांना मदत करणारा विक्रम विश्वनाथ भोसले यांनी दोन ट्रॅक्टर आणि एक जे सी बी च्या सहाय्याने गोरेगाव गावाच्या हद्दीतील येरळा नदी तीरावर गौण खनिज विना परवाना उत्खनन केले होते. सरपंच सुशिलकुमार दत्तू डोईफोडे हे पुर्वी महाराष्ट्र राज्य कृषी विभाग या खात्याच्या (वसुंधरा पाणलोट विकास समिती) गोरेगाव या समितीचे अध्यक्ष होते. त्या योजनेतंर्गत गोरेगावच्या हद्दीत दोन केटी वेअर बंधारे मंजूर झाले होते. त्या बंधार्याच्या बांधकामाला लागणारी वाळू सरपंचानी विकली तसेच सरकारी दवाखाना (आरोग्य उपकेंद्र) बांधकामासाठी लागणारी वाळू येरळा नदीतून अंदाजे 120 बास व गावच्या गायरानातून 400 ब्रास मुरूम त्या कामासाठी विकली होती.
याबाबत लेखी तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच अंबवडे-गोरेगाव रस्त्यासाठी गायरान गट नं.115 या ठिकाणाहून पाच हजार ब्रास मुरुमाचे उत्खन्न केले आहे. गोरेगावच्या सरकारी जागेतील विना परवाना गौण खनिज उत्खननाचा पंचनामा महसूल विभागाने चक्क सात महिन्या
ने केला आहे.
यापूर्वी दि. 27 जून 2021 रोजी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी, दोन पंच यांनी अंबवडे गावी पायी चालत जावून पाहणी केली. येरळा नदीचे पात्रात एक जेसीबी, दोन डँपर, व एक बुलेट मोटार सायकल होती. त्या ठिकाणी पाच ते सहा लोक जे सी बी चे राहाय्याने डंपर मध्ये नदी पात्रातील वाळू भरत असल्याचे दिसले.अशी एफ. आय. आर. मध्ये नोंद असूनही महसूल विभागाने अध्याप ही ठोस अशी कारवाई केली नाही. तसेच फौजदारी गुन्हा दाखल होऊनही सरपंच पद भूषिवित आहेत. त्यामुळे तक्रारदार तसेच रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप यांनाच सातत्याने पाठपुरावा करावा लागत आहे.
खटाव महसूल विभागालाच तक्रादारांना पंचनामा लिहून दया अशी सांगण्याची वेळ आल्यानंतरच जर विना परवाना गौण खनिज उत्खननाबाबत पंचनामा होत आहे. असा खटाव तालुक्यात कारभार होत असेल तर सामान्य माणसाला न्याय कोण देणार? सर्वच यंत्रणा दावणीला बांधली आहे का?असा सवाल तक्रारदार जिल्हा प्रशासनाला विचारू लागले आहेत. आठ महिन्यांपूर्वी केलेल्या तक्रारीचा पंचनामा चक्क दि. 1 फेब्रुवारी 2022 रोजी म्हणजे विलंबाने पंचनामा करून कोणाला पाठीशी घातले जाते? एवढे असूनही तक्रारदारांनाच तुमचे म्हणणे काय आहे ते पाठवा. असा सल्ला देऊन हे प्रकरण दाबण्याचा कसोशीने प्रयत्न केला जात आहे.
0 Comments