Ticker

6/recent/ticker-posts

दहिवडीत महेश जाधवांचे बंडखोरीचे निशान

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
दहिवडी: 
  दहिवडी नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी मधून सागर पोळ भाजप मधून माजी नगराध्यक्ष धनाजी जाधव, शिवसेने मधून, आमदार जयकुमार गोरे व शेखर गोरे यांच्या भगिनी सुरेखाताई पखाले तर भाजपच्या सूचक व अनुमोदक च्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी चे नगरसेवक महेश जाधव यांनी अर्ज दाखल केले.
प्रांत अधिकारी शैलेश सूर्यवंशी व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्या उपस्थितीत अर्जाची छाननी करण्यात आली. छाननीमध्ये चारही अर्ज वैध घोषित करण्यात आले.
सध्या, निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये अपक्षाच्या पाठिंब्यासह राष्ट्रवादी नऊ, भाजप पाच आणि शिवसेना तीन असे नागसेवकांचे पक्षीय बलाबल आहे. अपक्षाच्या पाठिंब्यामुळे दहिवडी नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादीची सत्ता येणारच असे जवळपास निश्‍चित झाले होते. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची सख्या मोठ्या प्रमाणात वाढली. सर्वांचे एका नावावरती एकमत होत न्हवते मात्र राष्ट्रवादी पक्षातील बहुसंख्य नगरसेवकांनी सागर पोळ यांना हिरवा कंदील दाखवला, मात्र यामुळे राष्ट्रवादी चे नगरसेवक महेश जाधव खूपच नाराज झाले कारण की त्यांची नगराध्यक्ष होण्याची प्रबळ इच्छा होती त्यामुळे त्यांनी पक्षश्रेष्टींचे आदेश डावलून जाधव भावकीला सोबत घेऊन थेट माजी नगराध्यक्ष धनाजी जाधव यांच्याशी संधान करून सूचक म्हणून भाजपच्या राणी तानाजी अवघडे व अनुमोदक म्हणून उज्ज्वला अमर पवार यांनी महेश जाधव यांच्या अर्जावर सह्या करून वेळ संपण्याच्या पाच मिनिटे अगोदर अर्ज दाखल केला. त्यामुळे अचानक राष्ट्रवादी च्या गोटात शुकशुकाट पसरल्याचे चित्र दिसून आले.
 नगरसेवकाच्या बंडामुळे राष्ट्रवादीची सत्ता येणार की जाणार सगळीकडे उत्सुकता
महेश जाधव यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी चे सत्तास्थापनेचे स्वप्न भंगणार की शिवसेनेला सोबत घेऊन राष्ट्रवादी सत्ता स्थापन करणार याकडे दहिवडीकरांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर बहीण सुरेखाताई पखाले यांच्या मुद्यावर दोघे भाऊ,आमदार जयकुमार गोरे व शेखर गोरे एकत्र येऊन सुरेखाताई पखाले यांना नगराध्यक्ष पदावरती विराजमान करणार अशी कुजबुज दहिवडी परिसरामध्ये सुरु आहे.तसेच  राष्ट्रवादी पक्ष बंड केलेले युवा नगरसेवक महेश जाधव यांची विनवणी करून राष्ट्रवादिला एकसंघ ठेऊन नगरसेवक सागर पोळ यांना नगराध्यक्ष पदावर विराजमान करणार याची उत्सुकता ही दहिवडी करांना लागली आहे.

Post a Comment

0 Comments