Ticker

6/recent/ticker-posts

चांदणी चौकात ट्रक-दुचाकींचा अपघात वृद्धाचा मृत्यू

फोटो ओळी :- मायणी :येथील चांदणी चौक याठिकाणी ट्रक व दुचाकी यांचा झालेला अपघात. (इनसेट मध्ये मयत दुर्दैवी दादासो शिंदे.)
 मायणी :- दत्ता कोळी
थील मल्हारपेठ - पंढरपूर व मिरज -भिगवण या महामार्ग छेदठिकानावरील चांदणी चौक परिसरात ट्रक आणि दुचाकी (लुना) यांचा अपघात गंभीर जखमी झालेल्या मोराळे ता.खटाव येथील दादासो पांडुरंग शिंदे (वय ६०) यांचे सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत घटनास्थळ व मायणी दूरक्षेत्र येथून मिळालेली माहिती अशी, दादासो शिंदे हे नेहमीप्रमाणे गुरुवार रोजी सकाळी ७ वाजल्याच्या सुमारास आपल्या मोराळे गावातून आपली दुचाकी घेऊन मायणी या ठिकाणी काही कामानिमित्त आले होते. यादरम्यान पंढरपूरकडून आलेला ट्रक व त्यांच्या दुचाकीची भीषण धडक झाल्याने दादासो शिंदे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी सातारा सिव्हिल याठिकाणी हलवण्यात आले होते. परंतु उपचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 
शिंदे यांच्या मृत्यूने मोराळे गाव व परिसरात हळहळ  व्यक्त होत आहे. या घटनेसंदर्भात अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments