वनविभाग वडूजच्या मायणी हद्दीत अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर वनविभागाने कारवाई केली असून तब्बल पावणेसोळा लाख किमतीचे वाहन व लाकूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे.
याबाबत मायणी वनविभागाकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी, दिनांक
१६/०३/२०२२ व १६/०३/२०२२ रोजी वनविभाग वडूजच्या मायणी हद्दीतील क्षेत्रात
गस्त करीत असताना वनक्षेत्रपाल वनपाल, मायणी वनपाल,वनरक्षक मायणी,वनरक्षक
कलेढोण हे विटा-दहिवडी रोड वर गस्त करीत असताना मायणी गावच्या हद्दीत
संशयित वाहनांची तपासणी केली असता वाहन क्रमांक एम.एच.११ ए.एल.५८९१ व वाहन
क्रमांक एम.एच.४२ ,टी-०४८० आणि एम.एच.४३ यु ४९१७ ही वाहने रायवळ कापीव
मिश्र लाकूड माल विनापरवाना वाहतूक करीत असताना मिळून आले वरील प्रमाणे तीन
ट्रक विनापरवाना लाकूड मालाची वाहतूक करीत असताना मिळून आलेले
वनविभागाकडील वनपाल मायणी व वनरक्षक मायणी यांनी भारतीय वन अधिनियम १९२७ चे
कलम ४१ (२) ब अन्वये वनगुन्हा नोंद करून सदरचे तीन वाहने व लाकूड माल जप्त
करण्यात आलेले आहेत. खालील कारवाईमध्ये एकूण १५ लाख ७५ हजार ५४० रुपये या
रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही उपवनसंरक्षक
महादेव मोहिते,सहाय्यक वनसंरक्षक रेश्मा व्होरकाटे यांचे मार्गदर्शनाखाली
करण्यात आलेली आहे.

0 Comments